शेतकऱ्याचा शेतात संशयास्पद मृत्यु; घातपात झाल्याचा परिवाराचा आरोप

शेजारील शेतकऱ्यासोबत शेतातील रसत्यावरुन गेल्या दीड ते दोन महिन्यापासुन वाद चालू होता.
CRIME
CRIMECRIME

कळमसरे (अमळनेर) ःलोण (ता.अमळनेर) येथील शेतकरी रविन्द्र देवराम पाटील उर्फ छोटू अण्णा (वय-५५) हे आज (ता. ८) रोजी रात्रीचा विजपुरवठा असल्याने पहाटे ४.३० वाजता ठिबक सिंचनच्या साहय्याने लावलेल्या कापसाला पाणी देण्यासाठी गेले असता सकाळी ७.३० वाजेपर्यतच विजपुरवठा असल्याने सकाळी १०.३० वाजले तरीही उशीरापर्यंत आले नसल्याने परिवारातील सदस्य त्यांच्या तपासासाठी गेले असता ते शेतात मृत आढळून आले. (lone village suspicious death of a farmer in a field)

CRIME
जिल्हा कोविड रुग्णालयात म्यूकोरमायकोसिसची चौथी शस्त्रक्रिया !

मयत रविन्द्र देवराम पाटील उर्फ छोटू अण्णा यांचा आणि शेजारील शेतकऱ्यासोबत शेतातील रसत्यावरुन गेल्या दीड ते दोन महिन्यापासुन वाद चालू होता. मयताच्या अंगावर यात मानेवर, पायावर, आणि हातावर किरकोळ जखमा दिसत असल्याने घरच्यांनी आरोप करीत जोपर्यंत त्यांना अटक होत नाही. तोपर्यंत जागेवरुन प्रेत हलु देणार नाहीत अशी भूमिका घेतल्याने गोंधळ उडाला होता.

संशयितांची चौकशी सुरू

घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी राकेश जाधव, मारवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल फुला यांनी परिवाराला समज देत तीन संशयिताची कसुन चौकशी सुरु आहे. दरम्यान अमळनेर येथे ग्रामीण रुग्णालयात प्रेत शव विच्छेदनासाठी पाठविन्यात आले आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावरच नेमके काय ते कळणार असल्याने पोलीस उपविभागीय अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाने मारवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल फुला आणि त्यांची टीम संशयिताची कसुन चौकशी सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com