अक्कलपाडा धरणांतून "पांझरा"त आवर्तन सोडा ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अक्कलपाडा धरणांतून "पांझरा"त आवर्तन सोडा !

अक्कलपाडा धरणांतून "पांझरा"त आवर्तन सोडा !

अमळनेर : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पांझरा नदीकाठावरील 16 गावांसह, धुळे व शिंदखेडा तालुक्यातील काही गावांतील विहिरींची पाणीपातळी कमी झाल्याने पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. यासाठी अक्कलपाडा धरणातुन पांझरा नदीत आवर्तन सोडण्यात यावे यासाठी आमदार अनिल पाटील यांनी धुळे येथील अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांची प्रत्यक्ष भेट घेत साकळे घातले.

मुडी फडबंधारा दुरूस्तीसाठी जिल्हा नियोजन समिती मधुन 20 लक्ष निधीस मंजुरी देण्यात यावी अशी मागणी देखील केली,यास अप्पर जिल्हाधिकार्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. दरम्यान पांझरा नदीत आवर्तन लवकरात लवकर सोडल्यास अमळनेर तालुक्यातील पांझरा काठावरील 16 गावांसह, धुळे व शिंदखेडा तालुक्यातील पांझरा नदीकाठांवरील गावांची पिण्याच्या पाण्याची समस्या सुटनार असल्याची बाब आमदारांनी जिल्हाधिकारी यांना लक्षात आणुन दिली,

आणि सद्यस्थितीत या गावांना पाण्याच्या किती अडचणी आहेत ते देखील लक्षात आणून दिले,यावेळी आमदारांसोबत जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गौरव पाटील उपस्थित होते.

संपादन- भूषण श्रीखंडे

Web Title: Marathi News Amalner Mla Demand Release Water Akkalpada

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :waterdamjalgaon news
go to top