esakal | गाव करील ते राव काय करील; सोशल मिडीयावरून हाक अन्‌ उभी राहिली लाखाची मदत
sakal

बोलून बातमी शोधा

help social media

मारवड येथील रामकृष्ण युवराज सोनवणे यांना अचानक पॅरेलिसेसचा (अर्धांग वायु) झटका आल्याने त्यांचे एक हात व पाय निकामी झाला. त्यांना नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

गाव करील ते राव काय करील; सोशल मिडीयावरून हाक अन्‌ उभी राहिली लाखाची मदत

sakal_logo
By
प्रा.हिरालाल पाटील

कळमसरे (ता.अमळनेर) : अर्धांग वायुचा झटका आल्‍याने रूग्‍णालयात उपचार होवू शकतील अशी घरची परिस्‍थिती नाही. पण सोशल मिडीयातून मदतीचे आवाहन करण्यात आले. गावकऱ्यांनी देखील याला प्रतिसाद देत उपचार होवू शकतील; इतकी लाखाची मदत उभी करून दिली.

मारवड येथील रामकृष्ण युवराज सोनवणे यांना अचानक पॅरेलिसेसचा (अर्धांग वायु) झटका आल्याने त्यांचे एक हात व पाय निकामी झाला. त्यांना नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र परिस्थिती हलाकीची असल्याने मारवड गावातून त्यांच्या उपचारासाठी सव्वा लाखाच्या आसपास मदतीचा हात मिळाल्याने सोनवणे परिवाराला दिलासा मिळाला.

नाशिकला वास्‍तव्य
रामकृष्ण सोनवणे यांची म्हातारी आई आहे. घरची आर्थिक परीस्थिती खुपच बिकट आहे. नाशिक येथे म्हातारी आई व रामकृष्ण हे गेल्या दहा वर्षापासुन कामधंद्यानिमित्ताने भाड्याच्या रूममध्ये राहतात. शनिवारी (ता.12) रामकृष्णला अचानक पॅरेलिसेसचा झटका आला. यानंतर रामकृष्णला आईने नाशिक येथे सुखकर्ता हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

औषधी उधार आणली अन्‌
परीस्थिती अत्यंत गरिबीची असल्यामुळे हॉस्पिटलचा खर्च आईवर पेलावत नसल्याने सुरुवातीला औषधी ही आजीने उधार आणल्या. मारवड येथील समाधान पाटील, राहुल पाटील यांना निरोप लागल्याने रामकृष्णला हॉस्पिटलमध्ये पाहायला गेले असतांना अत्यंत वाईट परिस्थिती असल्याने आजींना धीर देत आमच्याकडून जेवढ होईल तेवढी मदत करू. यानंतर समाधान व राहुलने ठरवल्यावर त्यांनी सोशल मिडीयावर आवाहन करून आर्थिक स्वरूपात मदत करण्यासाठी विनंती केली.

आवाहनाला लागलीच प्रतिसाद
समाधान आणि राहुलने सोशल मिडीयावर आवाहन करत रामकृष्ण व त्यांच्या आईचे बँकेच्या खाते नंबर देऊन दात्यांनी मदत मागितली. याला लागलीच प्रतिसाद मिळाल्‍याने दिलासा मिळाला आहे. मात्र, अजूनही मदतीची गरज असल्याने रामकृष्‍ण पाटील व कमलाबाई पाटील यांचे खाते नंबर देऊन मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

संपादन ः राजेश सोनवणे