लॉकडाऊमूळे उधवस्त होणारा संसार वेळेत सावरला !

उमेश काटे
Wednesday, 28 October 2020

पती विशाल व त्यांचे मामा यांनी सदवर्तनाची व आपसातील तणाव मिटविण्या बाबत वचनचिट्ठी लिहून घेत दुभंगलेल्या संसाराची नवीन पायाभरणी झाली.

अमळनेर : कोरोना विषाणूमुळे देशावर संकट आले होते या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशात मार्च महिन्यात लॉकडाउन पुकारले. जवळ चार ते पाच महिने संपूर्ण देश लाॅकडाऊन मध्ये गेल्याने आर्थिक, समाजीक समस्यांबरोबर  कौटुंबीक कलह देखील मोठ्या प्रमाणात वाढले होते. असेच बुलढाणा येथील एका दाम्पत्यांच्या बाबत घडले.  

अचानक देशात लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामुळे सर्वच उद्योग धंदे थांबल्याने बुलढाणा येथील विशालचा आर्थिक अडचणीत आला. आर्थिक अडचणी, नातेवाईक यांचा अकारण हस्तक्षेप, व परस्पर सामंजस्याचा अभाव यामुळे एक संसार दुभंगला होता.

महिला अन्याय विरोधी समितीचा पुढाकार  

दोन कन्या असलेला विशाल व अमळनेर येथील सुचिता (नाव बदलले आहे) यांच्या संसारात मोठे वितुष्ट आले होते. सुचिताचे बहीण व पाहुणे यांनी महिला अन्याय विरोधी समितीचे धनंजय सोनार यांची मदत घेतली. श्री.सोनार यांनी यांचे दोन्ही कुटुंबाचे शास्त्रीय समुपदेशन केले. यशस्वी मार्ग निघून सुचिता ही विशाल याचे सोबत बुलढाणा येथे नांदावयास रवाना झाली. 

दुभंगलेल्या संसाराची पायाभरणी 

पती विशाल व त्यांचे मामा यांनी सदवर्तनाची व आपसातील तणाव मिटविण्या बाबत वचनचिट्ठी लिहून घेत दुभंगलेल्या संसाराची नवीन पायाभरणी झाली. अमळनेरच्या महिला अन्याय विरोधी समितीच्या पुढाकाराने एक परिवार सावरला आहे. या बद्दल दोन्ही परिवार व उपस्थितांनी धनंजय सोनार यांचे आभार व्यक्त केले. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner recovered due to counseling on family disputes prevention violence against women