esakal | स्वच्छ सर्वेक्षणात जळगाव जिल्ह्यातील नगरपालिकांची उत्तम कामगिरी 
sakal

बोलून बातमी शोधा

स्वच्छ सर्वेक्षणात जळगाव जिल्ह्यातील नगरपालिकांची उत्तम कामगिरी 

जळगाव जिल्ह्यातील १६ नगर परिषदा व जळगाव महापालिकेपैकी सावदा पालिका सोडता सर्व पालिका या राज्यात पहिल्या शंभरमध्ये आहेत.

स्वच्छ सर्वेक्षणात जळगाव जिल्ह्यातील नगरपालिकांची उत्तम कामगिरी 

sakal_logo
By
सुधाकर पाटील

भडगाव : जिल्ह्यातील नगर परिषदांनी गेल्या वर्षीच्या तुलनेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात उत्तम कामगिरी केली आहे. यंदा १६ नगर परिषदांची रँकिंग वाढली आहे. नाशिक विभागात पहिल्या दहामध्ये जळगाव जिल्ह्यातील तीन, तर राज्यात अमळनेर पालिका दहाव्या क्रमांकावर आहे. 

जळगाव जिल्ह्याने यंदा स्वच्छ सर्वेक्षण अभियानात वेस्ट झोनसह राज्यात नगर परिषदांनी झेंडा फडकावला आहे. जळगाव जिल्ह्यातील १६ नगर परिषदा व जळगाव महापालिकेपैकी सावदा पालिका सोडता सर्व पालिका या राज्यात पहिल्या शंभरमध्ये आहेत. जळगाव जिल्ह्यातील शहराचा स्वच्छतेचा टक्का वाढला असल्याचे स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या गुरुवारी लागलेल्या निकालावरून दिसून आले आहे. 

राज्यात पहिल्या शंभरमध्ये १५ नगर परिषदा 
राज्यात पहिल्या शंभरमध्ये जळगाव जिल्ह्यातील तब्बल १५ नगर परिषदांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यात जळगाव जिल्हा अव्वल ठरला असल्याचे चित्र आहे. त्यात (कंसात राज्यातील रॅक) भडगाव (४०), पाचोरा (२७), एरंडोल (३३), धरणगाव (६३), चोपडा (३१), रावेर (५१), यावल (९०), सावदा (१०२), फैजपूर (५९), अमळनेर (१०), पारोळा (७६), जामनेर (१४), वरणगाव (२२), भुसावळ (१४), बोदवड (५१). जळगाव महापालिका २० व्या स्थानावर आहे. 

जामनेर राज्यात चौदावे 
जामनेर : पालिकेमार्फत वेळोवेळी राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे राज्यातील २०२० मधील सर्वेक्षणात जामनेर पालिकेने १४ वा क्रमांक मिळवला आहे, अशी माहिती येथील नगराध्यक्षा साधना महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. विशेष म्हणजे देशातील पाच राज्यांच्या पश्‍चिमी झोनमधील सुमारे ३०० शहरांच्या सर्वेक्षण स्पर्धेतही पंधरावा क्रमांक मिळविला आहे. 

नगर परिषदा…..गेल्या वर्षीची झोन रँक (२०१९)...या वर्षीची झोन रँक (२०२०)..राज्यस्तरीय रँक 
भडगाव...........१०८...……….४९...………..४० 
चाळीसगाव........७०७...……….७३...……….४३ 
पाचोरा.........….८३...………..४६...………...२७ 
एरंडोल………..२३७...………..३९...………...३३ 
धरणगाव……….२२९...……….८६...………...६३ 
चोपडा………….४१६...……….५१...………...३१ 
रावेर…………..२५२...………...७३...………..५१ 
यावल………...४५६...…………१६०...………..९० 
सावदा………..२०४...………….१६३...……….१०२ 
फैजपूर………..५६७...…………..८२...………..५९ 
अमळनेर……….१३०...………….१०...………१० 
पारोळा………..५२०...…………...११५...……..७६ 
जामनेर………..२४८...…………...१५...……….१४ 
वरणगाव……….७९...…………….२३...……….२२ 
भुसावळ………………………………………...१४ 
बोदवड………(सर्वेक्षण नाही)…………..७४...……….५१ 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top