कोरोना आजाराने प्रसिध्द डाॅ. जीवन बोरा यांचे निधन 

कोरोना आजाराने प्रसिध्द डाॅ. जीवन बोरा यांचे निधन 

कजगाव: येथील कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने पाचोरा येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल येथील सुप्रसिध्द डॉ जीवन बोरा वय 55 यांचे बुधवारी ता.(19) दुपारी 1 वाजे सुमारास निधन झाले. कजगाव सह परिरातील खेड्या गावात मितभाषी नम्र डॉक्टर म्हणून ते प्रसिध्द होते त्यांच्या निधनाने वैद्यकिय क्षेञ आणि ग्रामीण भागातूल नागरिकांना मोठा धक्का बसला असून सर्वञ शोक व्यक्त करण्यात आला

.कजगाव येथील स्टेशन रोड वर डॉ बोरा यांचे क्लिनिक होते गेल्या महीन्यापूर्वी त्यांना बरे वाटतं नव्हते त्यामुळे पाचोरा येथे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेले असता तब्येत अधिक खालावली असता औरंगाबाद येथील मोठ्या खाजगी उपचारासाठी नेण्यात आले नंतर ते कोरोना पॉझिटव्ह आले यापूर्वी देखील इतर व्याधीवर ऑपरेशन झाले होते तेथे उपचारा केल्या नंतर काही दिवसापूर्वी त्यांना घरी आणले होते परंतु पुन्हा श्वास घेण्यासाठी ञास जाणवत असल्याने डॉ बोरा यांना पाच दिवसापूर्वी पाचोरा येथे खाजगी रूग्णालय दाखल केले होते त्यांना व्हेटिलेटरवर ठेवण्यात आले होते पण प्रकृतीने साथ त्यांना साथ दिली नाही. यामुळे बुधवारी दुपारी 1 वाजे नंतर डॉ जीवन बोरा यांची कोरोना मुळे निधन झाले ही वार्ता कजगाव सह परिसरात वार्या सारखी पसरली आणि वैद्यकिय क्षेञासह सामान्य नागरिकांमध्ये शोककळा पसरली.

गोरगरीबांचा डॉक्टर

मुळचे गोंडगाव ता भडगाव येथील रहीवाशी.डॉ बोरा हे परिसरात गरीब नागरिकांना निशुल्क वैद्यकिय सेवा देत ,लहान बालक रूग्णावर त्यांचे विशेष प्रेम होते परिसरात गोरगरीबांचा डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती होती ,काहीतर तर त्यांना देव माणूस मानतं रूग्ण सेवा ही सकाळी कजगाव आणि सायंकाळी गोंडगाव येथे अहोराञ करीत होते कोरोना संसर्ग होण्या अगोदर ही त्यांनी रूग्णसेवा करीत होते ,कमी खर्चात रूग्ण बरा व्हावा यासाठी त्यांचा नेहमी प्रयत्न असायचा. डॉ. बोरा यांच्या मागे पत्नी ,एक मुलगी,दोन मुले असा परिवार आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com