esakal | बिझनेस डेव्‍हलपमेंट युनिट्‌स फास्‍ट ट्रॅकवर
sakal

बोलून बातमी शोधा

railway truck transport

मध्य रेल्‍वेने उद्योगांना मालवाहतूक व पार्सल लोडिंगला चालना देण्यासाठी अनेक बाबतीत पुढाकार घेतला आहे. यासाठी बरबतपूर, बाळे, रावेर, भिवंडी रोड आणि कसबे- सुकेणे येथे नवीन गुड्‌स शेड सुरू केले आहेत. अजनी, चिंचवड, मिरज आणि भुसावळ येथे अंतर्गत कंटेनर डेपोचे गुड्‌स शेडमध्ये रूपांतर केले.

बिझनेस डेव्‍हलपमेंट युनिट्‌स फास्‍ट ट्रॅकवर

sakal_logo
By
चेतन चौधरी

भुसावळ : मध्‍य रेल्‍वेने अलीकडेच क्षेत्रीय आणि विभागीय स्‍तरावर व्यवसाय विकास युनिट स्‍थापित केले आहेत. हे युनिट्‌स स्‍थनिक शेतकरी, व्यापारी आणि वैयक्‍तिक संस्‍थेकडे नवीन प्रस्‍ताव आणि लवचिक योजनांची बाजारपेठ तयार करतात. त्‍यांच्या मागण्या एकत्रित करतात. या उपक्रमामुळे नवीन व्यापार आणि उद्योगाशी संबंध सुदृढ झाला. लवचिक योजना, कमी दर, वेगवान, सुरक्षित अन्‌ संरक्षित वाहतूक आणि अधिक महत्‍त्‍वाचे म्‍हणजे पर्यावरणास अनुकूल अशा गोष्‍टीमुळे गुड्‌स व वस्‍तूंच्या रेल्‍वे वाहतुकीसाठी उद्योगजगतातकडून प्रतिसाद मिळत आहे. भुसावळ आणि रावेर येथून मालवाहतूक होत असल्‍याने जिल्‍ह्‍यातील शेतकरी आणि उद्योकांना याचा फायदा होणार आहे.

मध्य रेल्‍वेने उद्योगांना मालवाहतूक व पार्सल लोडिंगला चालना देण्यासाठी अनेक बाबतीत पुढाकार घेतला आहे. यासाठी बरबतपूर, बाळे, रावेर, भिवंडी रोड आणि कसबे- सुकेणे येथे नवीन गुड्‌स शेड सुरू केले आहेत. अजनी, चिंचवड, मिरज आणि भुसावळ येथे अंतर्गत कंटेनर डेपोचे गुड्‌स शेडमध्ये रूपांतर केले. शिवाय रेल्‍वेने सांगोला, पंढरपूर, मोडनिंब, बेलवंडी, कोपरगाव, भिवंडी रोड स्‍थानकात पार्सल लोडींगसाठी सुरू केले आहे. बैठका आणि वेबिनारद्वारे विपनणामुळे प्रथमतःच बांगलादेशात कांदा पाठविला.

शेतकऱ्यांना फायदा
मध्य रेल्‍वेने टाटाच्या कार बांगलादेशात, महिंद्राची वाहने खडगपूरला, ट्रॅक्‍टर फिरोजपुरला, सारखरेची बारामतीहून त्रिपुरा आणि कराडहून तिरूनेलवेलीला वाहतुक केली. या व्यतिरिक्‍त नाशवंत भाजीपाला आणि फळांच्या वाहतुकीसाठी शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्‍या किसान रेल्‍वे, तसेच मध्यरेल्‍वेने बाळे (सोलापूर) येथून रोल ऑन रोल ऑफ (रो.रो.) वाहतुकीचे काम सुरू केले.

वाहन उद्योगांना सुविधा
पुणे विभागाने चिंचवड गुड्‌स शेड ते एर्नाकुलम येथे सुमारे नऊ वर्षानंतर ऑटोमोबाईल रॅकची वाहतुक करण्यात आली. पुण्याहून बांगलादेशात ७५ गाड्यांची वाहतूक केली. प्रथमच कराडहून तामिळनाडू राज्‍यातील तिरूनेलवेली आणि विलुपूरम येथे सारखेची वाहतूक केली. बारामती हे त्रिपुरा येथेही साखर नेण्यासाठी भुसावळ विभागाने महिंद्रा लॉजिस्‍टिक लि. च्या वाहनांची वाहतूक नाशिकहून कलैकुंडा, खडगपूर येथे केली. ओरिएंट सिमेंटसाठी गंज बसोदा येथे सिमेंटचा मिनी रॅक पाठविला. भारतीय अन्न महामंडळासाठी खंडवा येथून औरंगाबाद येथे गव्हाची वाहतूक केली.

बांगलादेशात ऑटोमोबाईल वाहतुक
पहिल्‍यांदाच कन्हाळलाप खताची नवीन वाहतूक केली. अजनी ते फुलेरा आणि बांगलादेश येथे पहिल्‍यांदाच ऑटोमोबाईलची वाहतुक रेल्‍वेने केली. प्रथमच कापूस बियाणे राजपूरला लोड केले. मालवाहतूक रेल्‍वेत चढवून बाळे ते नेलमंगळापर्यंत (रो-रो सेवा) दिली. बारामती ते त्रिपुरापर्यंत साखरेचे लोडींग केले. पॉवर लुम्‍स आणि टेक्‍स्‍टाईल बाय- प्रॉडक्‍टससाठी भिवंडी प्रसिद्ध असून, नवीन विकसीत केलेल्‍या भिवंडी गुड्‌स शेड पहिल्‍यांदाच वस्‍त्रोत्‍पादने पाठविण्यास तयार केले.

संपादन ः राजेश सोनवणे