esakal | भुसावळ विभागातील ३६ रेल्वेगाड्या रद्द; १६,१७ ला वाहतूक बंद!
sakal

बोलून बातमी शोधा

Train

भुसावळ विभागातील ३६ रेल्वेगाड्या रद्द; १६,१७ ला वाहतूक बंद!

sakal_logo
By
टीम ई सकाळ


भुसावळ : मध्य रेल्वेच्या (Central Railway) भुसावळ विभागातील (Bhusawal Division) जळगाव ते भादलीदरम्यान तिसऱ्या मार्गाची जोडणी करण्यासाठी यार्ड रि-मॉडलिंगसंदर्भात (Yard re-modeling) नॉन-इंटरलॉकिंगचे (Non-interlocking) काम हाती घेतले आहे. या पायाभूत सुविधांच्या कामामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या अप-डाउन मार्गावरील तब्बल ३६ प्रवासी रेल्वेगाड्या (Passenger train) आणि दहा मालवाहतुकीच्या पार्सल गाड्या (Freight train) १६ व १७ जुलैला रद्द करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. ( bhusawal division canceled thirty six trains in two days)

हेही वाचा: बीएचआर घोटाळा:पावत्या ‘माचिंगची’ २० टक्के रक्कम भरण्याची अट


भुसावळ, जळगावमधून धावणाऱ्या ३६ प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्याने या गाड्यांनी जाणाऱ्या प्रवाशांचे आरक्षणाचे तिकीटही रद्द होणार आहे. रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- हजरत निजामुद्दीन (०१२२१) विशेष राजधानी एक्स्प्रेस १६ आणि परतीच्या प्रवासात ही गाडी १७ जुलैला रद्द. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -नागपूर विशेष अतिजलद (०२१६९) ही गाडी १७, तर परतीच्या प्रवासात १६ जुलैला रद्द. पुणे- अजनी (०२२२३) विशेष वातानुकूलित १६ तर परतीच्या प्रवासात १३ जुलैला, तसेच पुणे- अमरावती विशेष वातानुकूलित १४ आणि परतीच्या प्रवासात १५ जुलैला रद्द. लोकमान्य टिळक टर्मिनस-प्रयागराज (०२२९३) विशेष दुरांतो १६, तर परतीच्या प्रवासात १७ जुलैला रद्द केली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस-आग्रा कॅंट (०२१६१) विशेष अतिजलद १६, तर परतीची गाडी १७ जुलैला रद्द केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- नागपूर दुरांतो (०२१८९) विशेष १७ आणि परतीच्या प्रवासात १६ जुलैला रद्द. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- अमरावती (०२१११) विशेष अतिजलद १७ आणि परत येताना १६ जुलैला रद्द . छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-अमृतसर ( ०१०५७) विशेष १६ आणि परतीच्या प्रवासात १९ जुलैला रद्द केली आहे. श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर- गोंदिया महाराष्ट्र (०१०३९) विशेष एक्स्प्रेस १५ जुलै आणि परतीच्या प्रवासात १७ जुलैला रद्द. नागपूर-पुणे हमसफर (०२०४२) विशेष गाडी १६ आणि परत येताना १५ जुलैला रद्द. पुणे- नागपूर विशेष वातानुकूलित १७ जुलैला आणि परत येताना १६ जुलैला रद्द. फिरोजपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (०२१३८) पंजाब मेल विशेष गाडी १८ आणि परतीच्या प्रवासात १६ जुलैला रद्द केली आहे. हरिद्वार- लोकमान्य टिळक टर्मिनस (०२१७२) विशेष वातानुकूलित १६ आणि परतीच्या प्रवासात १५ जुलैला रद्द. केवडिया- रिवा विशेष गाडी ( ०९१०५) १६ आणि परत येताना १७ जुलैला रद्द आहे. सुरत- अमरावती (०९१२५) विशेष अतिजलद गाडी १६, तर परत येताना १७ जुलैला रद्द केली आहे. नंदुरबार- भुसावळ (०९०७७) विशेष गाडी १६ व १७ जुलैला आणि परतीच्या प्रवासात १६ व १७ जुलैला रद्द केली आहे. भुसावळ- सुरत (०९००८) विशेष १६ व १७ आणि परत येताना १५ व १६ जुलैला रद्द केल्या आहे.

हेही वाचा: पत्नीच्या नावासाठी अन्य वन्यक्षेत्रपालांची पद्दोन्नती रखडवली

Train

Trainविशेष पार्सल गाड्या रद्द
देवळाली-मुजफ्फरपूर पार्सल विशेष १७ आणि परत येताना १९ जुलैला रद्द, सांगोला- मनमाड पार्सल विशेष गाडी १७ ला आणि मनमाड- दौंड पार्सल विशेष गाडी २० ला रद्द. पुणे-दौंड पार्सल विशेष गाडी १७ ला आणि परत येताना २० जुलैला रद्द. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- शालिमार पार्सल विशेष गाडी १६ ला आणि परतीच्या प्रवासात १८ जुलैला रद्द. हैदराबाद- अमृतसर पार्सल विशेष १६ ला तर परतीच्या प्रवासात १८ ला रद्द केल्या आहेत.

loading image