परवानगी मिळाल्यास मुंबई लोकलच्या धर्तीवर पॅसेंजर धावणार

वर्षभरात इगतपुरी- भुसावळ, भुसावळ- बडनेरा, भुसावळ- खंडवा या मार्गावर ताशी १२० ते १३० वेगाने एक्स्प्रेस गाड्या चालविण्याचे नियोजन आहे.
Passenger Train
Passenger TrainPassenger Train


भुसावळ: राज्यात अद्याप कोरोना संपला नसल्याने तूर्त पॅसेंजर गाड्या (Passenger Train) सुरू करण्यात येणार नाहीत. मात्र, राज्य शासनाने (State Government) परवानगी दिल्यास मुंबई लोकलच्या (Mumbai Local Train) धर्तीवर पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर अनिलकुमार लाहोटी (Central Railway General Manager Anil Kumar Lahoti) यांनी येथे दिली.

Passenger Train
पंजोखारा साहिब गुरुद्वाराचा इतिहास आहे रंजक..जाणून घ्या माहिती

भुसावळ विभागाच्या दौऱ्यावर श्री. लाहोटी आले असता, त्यांनी प्लॅटफार्म क्रमांक आठवर माध्यमांशी संवाद साधला. लाहोटी म्हणाले, की सध्या मध्य रेल्वेत ताशी ११० वेगाने एक्स्प्रेस गाड्या चालविल्या जात असल्या, तरी वर्षभरात इगतपुरी- भुसावळ, भुसावळ- बडनेरा, भुसावळ- खंडवा या मार्गावर ताशी १२० ते १३० वेगाने एक्स्प्रेस गाड्या चालविण्याचे नियोजन आहे.


अनुकंपा तत्वावर नऊ जणांना नोकरी
भुसावळ रेल्वे विभागात कोरोनामुळे नऊ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या परिवाराला शंभर टक्के भरपाई दिली असून, कुटुंबातील सदस्यालानोकरी (अनुकंप) दिली आहे. दोन ते तीन कर्मचाऱ्यांची मुले शिक्षण घेत असून, नोकरीचे वय झाल्यानंतर त्यांना नोकरी दिली जाईल.

Passenger Train
भुसावळमार्गे गुन्हेगारीचे ‘रक्तचरित्र’ जळगावात


भुसावळ- भादली लाईन पुढील वर्षी होणार
जीएम लाहोटी म्हणाले, की भुसावळ-पाचोरा लाईनची पाहणी करून तिसऱ्या व चौथ्या लाईनचे सर्वेक्षण करण्यात आले. तिसऱ्या लाईनच्या कामाला सुरवात झाली आहे. भादली- जळगाव या चौथ्या लाईनचे काम सुरू झाले असून, भुसावळ-भादली चौथ्या लाईनचे काम पुढील वर्षी सुरू होईल.

Passenger Train
धुळ्यातील ‘डेंगी’प्रश्‍नी महापालिकेचे आयुक्त मैदानात


पीजेसह औरंगाबाद मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण
पाचोरा-जामनेर व चाळीसगाव-औरंगाबाद व जळगाव-औरंगाबाद-जालना या प्रस्तावित रेल्वे लाईनचे सर्वेक्षण झाले असून, पीजेचा जानेवारी, तर वरील रेल्वेलाईनचा मार्चपर्यंत अहवाल रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात येईल, अशी माहिती जीएम लाहोटी यांनी दिली. डीआरएम एस. एस. केडीया, एडीआरएम नवीन पाटील, वरिष्ठ परिचालन प्रबंधक आर. के. शर्मा, स्टेशन डायरेक्टर जी. आर. अय्यर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com