बापरे..मुंबई लाईनवर चार दिवसांचा ट्रॅफिक अन्‌ पॉवर ब्लॉक 

railway
railway

भुसावळ : मध्य रेल्वे मुंबई विभागातील कल्याण येथे पत्री पूल रेल्वे ओव्हर ब्रिजसाठी रेल्वेमार्गावर ७६.६७ मीटरचे ओपनवेब गर्डर उभारण्यासाठी चार ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक करणार आहे. चारपैकी दोन ब्लॉकचा तपशील रेल्वे प्रशासनाने जाहीर केला असून, उर्वरित २८ व २९ चा तपशील नंतर जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे रेल्वेगाड्यांना मार्गात थांबविण्यात येणार असून, प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. 

रेल्वे ब्लॉकमुळे शनिवारी २१ नोव्हेंबरला सकाळी सव्वादहा ते दुपारी सव्वादोनपर्यंत उपनगरी गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. यात डोंबिवली ते कल्याण स्थानकादरम्यान सकाळी ९.५० ते दुपारी २.१५ दरम्यान उपनगरी गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत कल्याण ते कर्जत/कसारादरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला/ठाणे/डोंबिवलीदरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील. 

गाड्यांचे डायव्हर्शन 
०२१६८ मंडुआडीह- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष, ०१०५९ लोकमान्य टिळक टर्मिनस -छपरा विशेष, ०२५४२ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष आणि ०१०६१ लोकमान्य टिळक टर्मिन-दरभंगा विशेष या गाड्या दिवा-वसई रोड-जळगावमार्गे वळविण्यात येणार आहेत. कल्याण येथील प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष गाड्यांना भिवंडी रोड आणि दिवा येथे थांबा देण्यात येईल. 

गाड्यांचे नियमन 
०२८१२ हटिया-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (टिटवाळा येथे), ०१०९४ वाराणसी- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (खडवली येथे), ०२६१७ एर्नाकुलम- हजरत निजामुद्दीन विशेष (दिवा जवळ) आणि ०४१५१ कानपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाड्या वाटेमध्ये थांबविण्यात येतील. 

गाड्यांचे वेळापत्रक पुनर्निर्धारण 
०१०७१ लोकमान्य टिळक टर्मिनस- वाराणसी विशेष २१ नोव्हेंबरला दुपारी दोनला सुटेल आणि ०१०९३ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-वाराणसी विशेष २२ नोव्हेंबरला मध्यरात्री एकला सुटेल. रविवार २२ नोव्हेंबरला डोंबिवली ते कल्याण स्थानकांदरम्यान सकाळी ९.२० ते दुपारी १.५० दरम्यान उपनगरी गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत कल्याण ते कर्जत/कसारादरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील. छत्रपती शिवाजी महाराज ते कुर्ला/ठाणे/डोंबिवलीदरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील. 

गाड्यांचे डायव्हर्शन 
०३२०१ पाटणा-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष, ०२१८७ जबलपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष, ०२१६८ मंडुआडीह-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष, ०१०५५ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष, ०२५४२ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष आणि ०१०६१ लोकमान्य टिळक टर्मिनस-दरभंगा विशेष या गाड्या दिवा-वसई रोड-जळगावमार्गे वळविण्यात येतील. कल्याण येथील प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष गाड्यांना भिवंडी रोड आणि दिवा येथे थांबा देण्यात येईल. 
 
गाड्यांचे नियमन 
०८२२५ हटिया-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (टिटवाळा येथे), ०१०९४ वाराणसी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (खडवली येथे) आणि ०२६१७ एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन विशेष थांबविण्यात येतील. 

गाड्यांचे वेळापत्रक पुनर्निर्धारण 
०१०७१ लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसी विशेष २२ नोव्हेंबर दुपारी १.४० ला सुटेल, ०२१८८ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-जबलपूर विशेष २२ नोव्हेंबरला दुपारी २.५५ वाजता सुटेल आणि ०२५८६ लोकमान्य टिळक टर्मिनस-बरौनी विशेष २२ नोव्हेंबरला दुपारी दोनला सुटेल. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com