esakal | उत्सवानिमित्त रेल्वेकडून गाड्यांचा विस्तार; विशेष ३२ गाड्या नव्याने धावणार
sakal

बोलून बातमी शोधा

railway

प्रवाशांचे हाल टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे उत्सव विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या असून, मुंबई, पुणे आणि नागपूरसाठी तब्बल ३२ गाड्या नव्याने सुरू करण्यात आल्या आहेत. 

उत्सवानिमित्त रेल्वेकडून गाड्यांचा विस्तार; विशेष ३२ गाड्या नव्याने धावणार

sakal_logo
By
चेतन चौधरी

भुसावळ (जळगाव) : सध्या दिवाळीनिमित्त गावाकडून शहराकडे परतणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, रेल्वे आरक्षण मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे उत्सव विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या असून, मुंबई, पुणे आणि नागपूरसाठी तब्बल ३२ गाड्या नव्याने सुरू करण्यात आल्या आहेत. 
यामध्ये गाडी क्रमांक ०१११५ पुणे-गोरखपूर (प्रत्येक गुरुवार) ३ ते ३१ डिसेंबरपर्यंत धावेल. ०१११६ गोरखपूर-पुणे (प्रत्येक शनिवार) ५ डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत धावेल. ०२१६७ लोकमान्य टिळक टर्मिनस -मंडुआडीह (दैनिक) १ ते ३१ डिसेंबरपर्यंत धावेल. ०२१६८ मंडुआडीह- लोकमान्य टिळक टर्मिनस (दररोज) २ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत सुरू राहील. ०२१३५ पुणे- मंडुआडीह (सोमवार) ७ ते २८ डिसेंबरपर्यंत. ०२१३६ मंडुआडीह-पुणे (बुधवार) ९ ते ३० डिसेंबरपर्यंत. ०१४०७ पुणे-लखनौ (मंगळवार) १ ते २९ डिसेंबरपर्यंत. ०१४०८ लखनौ-पुणे (गुरुवार) ३ ते ३१ डिसेंबरपर्यंत. ०१०३३ पुणे-दरभंगा (बुधवार) पासून २ ते ३० डिसेंबरपर्यंत. ०१०३४ दरभंगा-पुणे (शुक्रवार) ४ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत. ०२१०१ लोकमान्य टिळक टर्मिनस -हावडा (शुक्रवार, मंगळवार) १ ते २९ डिसेंबरपर्यंत. ०२१०२ हावडा- लोकमान्य टिळक टर्मिनस (रविवार, गुरुवार) ३ ते ३१ डिसेंबरपर्यंत. ०२१६५ लोकमान्य टिळक टर्मिनस -गोरखपूर (गुरुवार, सोमवार) पासून ३ ते ३१ डिसेंबरपर्यंत. ०२१६६ गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस (शुक्रवार, मंगळवार) ४ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत. ०१२३५ नागपूर-मडगाव (शुक्रवार) ४ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत. ०१२३६ मडगाव-नागपूर (शनिवार) ५ डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत. ०१०२१ लोकमान्य टिळक टर्मिनस -समस्तीपूर (बुधवार, शनिवार) पासून २ डिसेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत. ०१०२२ समस्तीपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस (शुक्रवार, सोमवार) पासून ४ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत. ०१०७९ लोकमान्य टिळक टर्मिनस -गोरखपूर (गुरुवार) पासून ३ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत. ०१०८० गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस (शनिवार) ५ डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत. ०२०३१ पुणे-गोरखपूर (मंगळवार, शनिवार) १ ते २९ डिसेंबरपर्यंत. ०२०३२ गोरखपूर-पुणे (गुरुवार, सोमवार) ३ ते ३१ डिसेंबरपर्यंत. ०२१४३ पुणे-बरौनी (शुक्रवार, रविवार) ४ ते २७ डिसेंबरपर्यंत. ०११४४ बरौनी-पुणे (रविवार, मंगळवार) ६ ते २९ डिसेंबरपर्यंत. ०२८७९ लोकमान्य टिळक टर्मिनस -भुवनेश्वर (बुधवार, शनिवार) ५ डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत. ०२८८० भुवनेश्वर- लोकमान्य टिळक टर्मिनस (सोमवार, गुरुवार) ३ ते ३१ डिसेंबरपर्यंत. ०२८६५ लोकमान्य टिळक टर्मिनस -पुरी (गुरुवार) पासून ३ ते ३१ डिसेंबरपर्यंत. ०२८६६ पुरी- लोकमान्य टिळक टर्मिनस (मंगळवार) १ ते २९ डिसेंबरपर्यंत. ०२८५८ लोकमान्य टिळक टर्मिनस -विशाखापट्टणम (मंगळवार) ८ ते २९ डिसेंबरपर्यंत. ०२८५७ विशाखापट्टणम - लोकमान्य टिळक टर्मिनस (रविवार) ६ ते २७ डिसेंबरपर्यंत. ०४१५२ लोकमान्य टिळक टर्मिनस -कानपूर (शनिवार) ५ डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत. ०४१५१ कानपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस (शुक्रवार) ४ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत धावेल. 
 
याप्रमाणे राहील आसनव्यवस्था 
०२१३५/ ०२१३६ आणि ०२०३१/ ०२०३२ या विशेष गाड्या ज्या एक द्वितीय वातानुकूलित, चार तृतीय वातानुकूलित, १२ शयनयान, तीन द्वितीय आसन श्रेणी डब्यांसह चालविण्यात येतील. त्यांच्याव्यतिरिक्त वरील सर्व उत्सव विशेष गाड्यांच्या संरचनेत कोणताही बदल नाही. 
 
आरक्षण उपलब्धता 
संपूर्ण आरक्षित उत्सव विशेष गाड्या क्र. ०२१६७, ०२१०१, ०१४०७, ०२१६३ आणि ०१०२१ या विशेष गाड्यांचे आरक्षण २९ नोव्हेंबर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस, नागपूर, पुणे येथून सुटणाऱ्या उर्वरित गाड्यांचे आरक्षण ३० नोव्हेंबरला सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि वेबसाइटवर सुरू होतील. फक्त कन्फर्म तिकीट असणाऱ्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची/प्रवास करण्याची परवानगी असेल. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

loading image