esakal | दिवाळी पर्वाचे असे केले स्‍वागत; दोनशे किलोमीटर सायकलिंग
sakal

बोलून बातमी शोधा

cycling wellcome diwali

सकाळी सहा वाजता सुरू केलेला हा सायकलिंगचा प्रवास भुसावळ येथील गांधी पुतळ्यापासून सुरू केला व साधारण अकरा वाजेपर्यंत शिरपूर येथे त्यांनी शंभर किलोमीटरचे अंतर पूर्ण केले.

दिवाळी पर्वाचे असे केले स्‍वागत; दोनशे किलोमीटर सायकलिंग

sakal_logo
By
चेतन चौधरी

भुसावळ (जळगाव) : स्पोर्ट्स अँन्ड रनर्स असोसिएशनचे प्रा. प्रवीण फालक, विजय पाटील व विद्याधर इंगळे यांनी तब्बल दोनशे किलोमीटर सायकलिंग करून भुसावळसाठी एक नवीन विक्रम स्थापन केला. दिवाळीचे स्वागत करण्यासाठी व पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी या तीनही सायकलपटूंनी भुसावळ ते शिरपूर व परत भुसावळ असा दोनशे किलोमीटरचा प्रवास सायकलींग करून पूर्ण केला. 
सकाळी सहा वाजता सुरू केलेला हा सायकलिंगचा प्रवास भुसावळ येथील गांधी पुतळ्यापासून सुरू केला व साधारण अकरा वाजेपर्यंत शिरपूर येथे त्यांनी शंभर किलोमीटरचे अंतर पूर्ण केले. त्यानंतर परतीच्या प्रवासात साधारणतः वीस किलोमीटर नंतर दोन ते तीन मिनिटांची विश्रांती अशा पद्धतीने पुन्हा त्यांनी परतीचा शंभर किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. 

लागले दहा तास
संपूर्ण प्रवासासाठी त्यांना तब्बल दहा तास लागले. इतक्या मोठे अंतर सायकलिंग करण्यासाठी जिद्द, चिकाटी व एकाग्रता हे गुण महत्त्वाचे आहेत असे प्रा. प्रवीण फालक यांनी नमूद केले. त्याशिवाय आपल्या सोबतच्या सहकाऱ्यांचा पाठिंबा व मनोधैर्य हे महत्त्वाचे असल्याचे मत विजय पाटील यांनी व्यक्त केले. 

अनोख्या सायकलींगचे स्‍वागत
प्रवासादरम्यान त्यांना असंख्य नागरिकांनी सायकलिंग करण्याविषयी व या उपक्रमाविषयी माहिती विचारली व इतक्या लांबच्या अंतर सायकलने पूर्ण करत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. त्याचबरोबर काही नागरिकांनी यापासून प्रेरणा घेऊन आम्ही देखील आमच्या शहरात सायकलिंग करू असे देखील आवर्जून सांगितले असे विद्याधर इंगळे यांनी सांगितले. या सायकल पटूंचे स्वागत करण्यासाठी यावल येथे भुसावळ रनर्सचे प्रवीण वारके व गणसिंग पाटील हे आवर्जून उपस्थित होते. या तीनही सायकल पटूंचे भुसावल रनर्सचे डॉ. तुषार पाटील, डॉ. निलिमा नेहेते, प्रविण पाटील, डॉ. चारूलता पाटील, पूनम भंगाले, ब्रिजेश लाहोटी, सचिन अग्रवाल, रणजित खरारे आदी सदस्यांनी अभिनंदन व कौतुक केले. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image
go to top