बापरे...क्‍वारंटाईन सेंटरमध्ये जेवणात अळ्या; ग्रामीण भागात पसरवले कोरोनाने पाय; करंजीत 20 पॉझिटिव्ह 

corona 2
corona 2
Updated on

बोदवड : शहरातील क्वारंटाईन सेंटरमध्ये पुरविण्यात आलेल्या जेवणात आज अळ्या निघाल्याने खळबळ उडाली आहे. याच क्‍वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या करंजी येथील 60 जणांपैकी 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

बोदवड तालुक्‍यात करंजी येथील 39 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संपर्कात आलेल्या एकूण 60 जणांना बोदवड कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन करून स्वॅब पाठविण्यात आले होते. यासंदर्भातील अहवाल प्रशासनास प्राप्त झाले आहेत. त्यात क्वारंटाइन असणाऱ्यांपैकी 20 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. बोदवड शहर पाठोपाठ आता ग्रामीण भागातही कोरोनाने एन्ट्री केली असून आरोग्य विभागासह प्रशासनाच्या डोक्‍याचा ताप वाढला आहे. बोदवड तालुक्‍यातील एकूण रुग्ण संख्या 37 झाली आहे दोन रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तालुक्‍यातील एकूण बरे झालेले रुग्ण 11असून, 
उपचाराधीन रुग्ण 24 आहेत 

क्वारंनटाईन सेंटर मध्ये असणाऱ्या दर मानसी जेवणाचा खर्च 150 रुपये आहे. त्यात सकाळचा नास्ता चहा दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण व हळदीचे दूध देण्यात येत असल्याची माहिती तहसील प्रशासनाकडून मिळाली. 
पुरवठा करण्यात येणाऱ्या संबंधित पुरवठादारास आरोग्य विभागाकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. क्‍वारंटाईन कक्षातील रुग्णांचे रोगप्रतिकारक शक्‍ती वाढविण्यासाठी पौष्टिक अन्न देणे आवश्‍यक असताना येथील क्‍वारंटाईन कक्षात निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे. 

कोल्हाडी सुद्धा रडारवर 
तालुक्‍यातील कोल्हाडी येथील 65 वर्षीय नागरिकाला अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. मात्र शनिवारी (ता. 20) त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना कोरोनाची बाधा झाली असल्याचा सकारात्मक अहवाल तालुका आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाल्याने परिसर सील करण्यात आला आहे. 
तर त्यांच्या संपर्कातील नागरिकांना होम क्‍वारंटाईन करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधी या बाबत लक्ष घालून ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नियुक्ती करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. 
 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shahada Bribery Case
Amarpani Mahadev Temple Incident Goes Viral in Nandurbar
Fake RPF Woman
What is the Jalgaon ACB bribery case in Parola?
Marathi News Esakal
www.esakal.com