
अविश्वास ठराव दहा विरुद्ध शुन्य,तसेच एक सदस्य गैरहजर , सरपंच संजय पाटील तटस्थ अश्या मतांनी मंजूर करण्यात आला.यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
जामठी(ता.बोदवड) ः येथून जवळच असलेल्या येवती गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच संजय बाळकृष्ण पाटील यांच्यावर गेल्या आठवड्यात अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी येथील ग्रामपंचायत विरोधी सदस्यांनी बोदवडचे तहसीलदार हेमंत पाटील यांना अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता.त्यावर तहसीलदार हेमंत पाटील यांनी आज ग्रामपंचायत येवती येथे विशेष सभा घेण्यात आली.
वाचा- लिंबाच्या शेतात सुरू होता पत्यांचा डाव, पोलिसांची धाड पडताच अंधारात सुरू झाली पळापळ
आज येवती ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार श्री हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अविश्वास ठरावावर मतदान घेण्यासाठी सभा घेण्यात आली.यामध्ये येवती येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच संजय पाटील यांच्या वरील अविश्वास ठराव दहा विरुद्ध शुन्य,तसेच एक सदस्य गैरहजर , सरपंच संजय पाटील तटस्थ अश्या मतांनी मंजूर करण्यात आला.यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य शांताराम वाघ,नारायण घ्यार,उपसरपंच यशोदाबाई जंजाळ,केशर बाई भिल,मनिषा निळे,ममता मुळे,गोपाळ माळी,अंजनाबाई सुकाळे,उषा सावरीपगार,छाया विसाळे हे उपस्थित सदस्य होते तसेच मांगो शेजोळे हे अनुपस्थित होते.सरपंच पाटील यांच्याविरोधातील अविश्वास ठराव पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला जाणार असल्याची माहिती तहसीलदार हेमंत पाटील यांनी दिली.
इन कॅमेरा झाली सभा
येवती ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या लोकनियुक्त सरपंच पाटील यांच्या विरोधात अविश्वास दाखल करण्यासाठी विरोधी सदस्यांचे बोटे वर करून मतदान घेण्यात आले असून सर्व इन कॅमेरा चित्रीकरण करून घेण्यात आले.
" येवती येथील काही ग्रामपंचायत सदस्य विकास कामात अडथडे आणत असुन वारंवार पैशांची मागणी करीत होते. त्यामुळेच कटकारस्थान रचले गेले"
- संजय पाटील ,लोकनियुक्त सरपंच येवती