पैसे भरण्यासाठी बँकेत आला आणि क्षणातच त्याची पिशवी झाली गायब, आणि सर्वाचे उडाले होश !

पैसे भरण्यासाठी बँकेत आला आणि क्षणातच त्याची पिशवी झाली गायब, आणि सर्वाचे उडाले होश !
Updated on

बोदवड  : शहरातील मुक्ताईनगर रस्त्यावरील स्टेट बँकेत तरुणाने डेअरीचा भरणा करण्यासाठी आणलेली आठ लाख ४० हजारांची रोकड भामट्याने लंपास केली. ही घटना गुरुवारी घडली. हा सर्व प्रकार ‘सीसीटीव्ही’त कैद झाला आहे. 

शहरातील अमर डेअरीचे मालक अमर खत्री यांनी पैशांचा भरणा करण्यासाठी त्यांचा वाहनचालक उमेश रमेश महाजन याला स्टेट बँकेत पाठविले होते. उमेश याने भरणा करण्यासाठी कापडी पिशवीत आठ लाख ४० हजार रुपये, तर दुसऱ्या पिशवीत ६० हजार रुपये, अशी एकूण नऊ लाखांची रक्कम आणली होती. उमेश कॅशिअरकडे ६० हजार रुपये मोजून देत असताना, जवळच खुर्चीवर आठ लाख ४० हजारांची दुसरी पिशवी ठेवली होती. ही पिशवी काही कळायच्या आत मागून आलेल्या तरुणाने उचलून नेली. हा प्रकार अगदी एका मिनिटात घडला. त्यानंतर पैशांच्या पिशवीची शोधाशोध केली असता, चोरटा फरार झाला होता. ही पिशवी चोरत असताना निळ्या रंगाचा शर्ट घातलेला २० ते २५ वर्षांचा तरुण बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्याला याकामी मदत करणारा पिवळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला तरुणही दिसतो. या प्रकरणी वाहनचालक उमेश महाजन (वय ४०) याच्या फिर्यादीवरून बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 


पोलिसांसमोर आव्हान 
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात याच बँकेत जिल्हा परिषदेचे सदस्य अनिल खंडेलवाल यांची पेट्रोलपंपाची ७० हजारांची रोकड चोरट्यांनी लांबविली होती. या घटनेचा तपास ‘सीसीटीव्ही’मुळे लवकर लावता आला होता. मात्र, कोरोनामुळे संबंधित तरुणाने तोंडावर मास्क लावले होते, तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसत नसल्याने पोलिसांसमोर ही चोरी शोधण्याचे मोठे आव्हान आहे. पोलिस निरीक्षक बळिराम हिरे तपास करीत आहेत. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Jalgaon flyover collapse contractor FIR
Marathi News Esakal
www.esakal.com