ग्रामपंचायतीवर प्रशासक बसणार, मग काय इच्छुकांचा झाला हिरमोड ! 

ग्रामपंचायतीवर प्रशासक बसणार, मग काय इच्छुकांचा झाला हिरमोड ! 
Updated on

मेहुणबारे (ता.चाळीसगाव):  चाळीसगाव तालुक्यातील सप्टेंबर ते डिसेंबर या दरम्यान 76 ग्रामपंचायतींच्या मुदत संपणार आहे.त्यामुळे या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक केली जाणार आहे.पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, सांख्यिकी विस्तार अधिकारी आणि कृषी विस्तार अधिकारी व  शिक्षकांचा समावेश होणार आहे. ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून नियुक्तीची आस लागलेल्या राजकीय पक्षांच्या पदाधिकारी यांना न्यायालयाच्या निर्णयामुळे धक्का बसला आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ येत्या सप्टेंबर ते डिसेंबर मध्ये संपणार आहे. त्या ठिकाणी निवडणुका न घेता प्रशासकाची नेमणूक केली जाणार आहे. याबाबतचा निर्णय राज्य शासनाने काढलेला आहे. मात्र,या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक न करता निवडून आलेला सरपंच किवा राजकिय पदाधिकाऱ्यांना या पदावर संधी द्यावी, अशी मागणी स्थानिक लोकांनी शासनाकडे करण्यात आली होती.शासन स्तरावर तसा निर्णयही झाला. मात्र सरकारच्या या निर्णयाविरोधात काहींनी न्यायालयाचे दार ठोठावले. न्यायालयाने प्रशासक म्हणून शासकीय अधिकाऱ्यंची नियुक्ती करावी असा  निर्णय दिला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशावरून त्या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नेमणूक केली जाणार आहे. यात विस्तार अधिकारी,अंगणवाडी प्रकल्प अधिकारी,पशुधन पर्यवेक्षक,केंद्रप्रमुख, जिल्हा परिषदेच्या शाळांचे मुख्याध्यापक,पंचायत, कृषी व सांख्यिकी अधिकारी आणि कृषी अधिकारी यांचा समावेश असणार आहे. 

राजकीय पदाधिकाऱ्यांची कोंडी

चाळीसगाव तालुक्यातील मुदत संपणाऱ्या 76 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक मे जुनमध्ये होणे अपेक्षीत होते. मात्र कोरोना संकटामुळे राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या निवडणूका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.या मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर राजकीय पदाधिकाऱ्यांची निवड करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तो न्यायालयात टिकला नाही. तालु्नयातील सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान 76 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रशासकाची नेमणूक केली जाणार आहे. न्यायालयाच्या निकालामुळे ग्रामीण भागातील शिवसेना,राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, भाजप सह इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची कोंडी झाली आहे.


76 ग्रामपंचायतींवर प्रशासक राज

चाळीसगाव तालुक्यात कळमडू, भामरे बु.,चांभार्डी खु.,चांभार्डी बु.,हातले, जामडी प्र., बहाळ, रोकडे, वाघले, वाकडी, वाघडू, पिंप्री खु., देवळी,शिंदी, बिलाखेड,अलवाडी, डोणदिगर, तळोंदे प्र.दे., खरजई, टाकळी प्र.चा., दसेगाव, रोहीणी, ओढरे, घोडेगाव, राजदेहरे, हातगाव, पिंपळगाव, तिरपोळे, वरखेडे बु., पळासरे, वाघळी, मुंदखेडे खु., मुंदखेडे बु., तामसवाडी, तळोंदे प्र.चा., कुंझर, पोहरे, भऊर, जामदा, भवाळी, खडकी बु., कोदगाव, पाटणा, दस्केबर्डी, हिंगोणे खु., खेडी खु., नांद्रे, मांदुर्णे, पिलखोड, सायगाव, देशमुखवाडी, पिंपळवाड निकुंभ, शिरसगाव, टाकळी प्र.दे., तमगव्हाण, टेकवाडे खु., बहाळ, धामणगाव, गोरखपूर, चितेगाव, जुनोने, बोरखेडा बु., रहिपुरी, वडगाव लांबे, तरवाडे, पिंप्री बु. प्र.दे., ब्राम्हणशेवगे, लोंढे, खडकीसीम, बेलदारवाडी, तांबोळे बु., भोरस बु., बाणगाव, रांजणगाव, बोढरे या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक केली जाणार आहे.

इच्छुकांचा पुरता झाला हिरमोड 

कोरोना संकटामुळे तालुक्यातील 80 सहकारी संस्था व 76 ग्रामपंचायतींच्या निवडणूका होवू शकल्या नाही.त्यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.सहकारी संस्थांमध्ये राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ व उंबरखेड येथील सर्वोदय शिक्षण प्रसारक संस्था या दोन नावाजलेल्या शिक्षण संस्थांच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपली आहे.मात्र या संस्थांना संचालक मंडळास काही महिने जीवदान मिळाले आहे.तर ग्रामपंचायतींमध्ये आमदारांसह मातब्बर राजकीय पुढाऱ्यांच्या गावांमध्येही निवडणूका होणे अपेक्षीत आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव आटोपल्यानंतर निवडणूकीचा मार्ग मोकळा होईल. निवडणूका पुढे ढकलण्यात आल्याने इच्छुकांचा पुरता हिरमोड झाला आहे.अनेक मातब्बर गावात आपली सत्ता यावी म्हणून निवडणूकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी दंड थोपटून तयार होते. त्यांना थांबावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com