भाजपने शेतकऱ्याची वीज तोडण्याचे पाप केले नाही

राज्यात यापूर्वी देखील १५ वर्षे आघाडीची सत्ता होती. तेव्हा अजित पवारांनी महाराष्ट्र लोडशेडिंग मुक्त करू अशी घोषणा केली होती.
BJP Leader Chandrasekhar Bavankule
BJP Leader Chandrasekhar BavankuleBJP Leader Chandrasekhar Bavankule
Updated on


चाळीसगाव ः मी उर्जामंत्री (Minister of Energy) असतांना राज्यातील वीजबिल थकीत (Electricity bill exhausted) असणाऱ्या ४५ लाख शेतकऱ्यांच्या (Farmers) बांधापर्यंत एकही लाईनमनला जाऊ दिले नाही. शेतकऱ्यांची वीज तोडायचे पाप आम्ही केले नाही (power connection was not broken). याउलट खरीप हंगामात महाविकास आघाडी सरकारने वीज कनेक्शन कट केले. त्यामुळे जनतेच्या मनातून हे सरकार उतरले असून या सरकारचे दिवस भरले आहेत’, अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेश सरचिटणीस, युवा मोर्चाचे प्रदेश प्रभारी तथा माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (BJP Leader Chandrasekhar Bavankule) यांनी केली.

(bjp leader chandrasekhar bavankule allegations against government on power connections)

BJP Leader Chandrasekhar Bavankule
श्री विठ्ठलाच्या चरणी माथा टेकून मुक्ताई पालखी माघारी

तालुक्यात युवा मोर्चा वॉरीअर्स शाखा उद्घाटन, विविध आघाड्यांचे पदाधिकारी नियुक्तीपत्र वाटपनिमित्ताने येथील आमदार मंगेश चव्हाण यांच्या ‘अंत्योदय जनसेवा’ कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष व पनवेलचे माजी उपमहापौर विक्रांत पाटील, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हा परिषदेचे सदस्य तथा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपट भोळे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, पंचायत समिती गटनेते संजय पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राठोड, बाजार समितीचे माजी सभापती सरदारसिंग राजपूत, ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, योगेश मैंद, प्रदेश सचिव विजय बनछोडे, हर्षल विभांडीक, प्रदेश सदस्य संकेत बावनकुळे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुनील पवार, शहराध्यक्ष भावेश कोठावदे, महिला आघाडी शहराध्यक्षा संगीता गवळी, शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते. श्री. बावनकुळे यांनी सांगितले, की

BJP Leader Chandrasekhar Bavankule
जळगाव जिल्ह्यात १४ लाखावंर कोरोनाच्या चाचण्या

भाजपने केले लोडशेंडिगमुक्त राज्य

‘राज्यात यापूर्वी देखील १५ वर्षे आघाडीची सत्ता होती. तेव्हा अजित पवारांनी महाराष्ट्र लोडशेडिंग मुक्त करू अशी घोषणा केली होती. मात्र, महाराष्ट्र लोडशेडिंगमुक्त भाजप सरकारच्या काळात झाला हे सर्वांनी पाहिले असे श्री. बावनकुळे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com