दिवसा वाळू चोरी...प्रशासनाने केले असे

girna river valu chori
girna river valu chori

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव तालुक्यातील गिरणा नदीपात्रातून वाळू चोरीचा धडाका सुरुच आहे. मात्र मेहूणबारे (ता.चाळीसगाव) भागाचे सर्कल ऑफिसर गणेश लोखंडे व सहकाऱ्यांनी वाळू माफियांवर कारवायाचा बडगा उगारल्याने खळबळ उडाली आहे. गिरणा पात्रातून वाळूची चोरी करणारे ट्रॅ्क्टर थेट शहरात घुसत आहेत. सर्कल ऑफिसर लोखंडे यांच्या पथकाने थेट शहरातच धाव घेत वाळूचे ट्रॅ्क्टर पकडले व महसूल विभागाकडे जमा केले. दोन दिवसात पथकाने दोन कारवाया केल्या. 
पावसाळा सुरु झाला तरी गिरणा नदीपात्रातून वाळू चोरी काही थांबली नाही. महसूल विभागाने वाळू चोरीला लगाम घालण्यासाठी अलीकडे दैनंदिन वाळू गस्ती पथक तयार केले, आठवड्याच्या सातही दिवस वेग वेगळे दिवशी हे पथक वाळू चोरी रोखण्यासाठी कार्यरत असले तरी आतापर्यंत या पथकांना वाळू चोरी रोखण्यास यश आले नाही. अपवाद मात्र मेहूणबारे पोलीस ठाण्याचे सर्कल गणेश लोखंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या काही दिवसापासून वाळू चोरी करणाऱ्या वाळु माफियांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. 

दिवसाढवळ्या वाळूचे ट्रॅक्टर शहरात
वाळू माफियांची मजाल म्हणजे दिवसाढवळ्या हे वाळू चोरी करीत आहेत.(ता.5)जुलै रोजी दुपारी 2.15 वाजेच्या सुमारास विना परवाना वाळू भरून वाहतुक करतांना (एमएच.20 एवाय.3500) हे लाल रंगाचे ट्रॅ्क्टर नागदरोडवर मंडळ अधिकारी गणेश लोखंडे व सहकाऱ्यांनी पकडले. हे ट्रॅक्टर  इरफान शेख अकिल रा. चाळीसगाव याचे मालकीचेे आहे. वाळूसह हे ट्रॅ्क्टर जप्त करून ते पुढील कार्यवाहीसाठी तहसीलदार यांच्याकडे सोपवले.

उपखेड येथेही कारवाई
उपखेड ता.चाळीसगाव) येथे दुसरी कारवाई सर्कल श्री लोखंडे, तलाठी एस के कनाके, आर. जे. राठोड, डी. एस.काळे व कोतवाल ऋषिकेश सोनवणे यांच्या पथकाने उपखेड येथे आज (ता.7) रोजी पहाटे 2.30 वाजेच्या सुमारास केली.विना क्रमांकाचे हे ट्रॅ्क्टर गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू वाहून नेतांना पकडले.पंडित गोविंदा देसले रा. देवघट (ता. मालेगाव) याच्या मालकीचे आहे.ते ट्रॅ्नटर वाळूसह जप्त करून मेहूणबारे पोलीस ठाण्यात जमा केले.गत महिन्यातही मंडळाधिकारी लोखंडे व सहकाऱ्यांनी वाळू वाहतुक करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला होता. वडगाव लांबे येथे महादेव मंदिराजवळ वाळू माफियांनी चक्क वाळू वाहतुकीसाठी रस्ताच तयार केला होता. ही माहिती मिळताच या पथकाने हा रस्ता जेसीबीने खड्डे करून बंद केला. या कारवाईमुळे वाळू माफिया धस्तावले असले तरी वाळू चोरी मात्र सर्रास सुरु असल्याचे कारवायांवरून दिसून येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com