esakal | खिचडी ऐवजी विद्यार्थ्यांना मिळणार आता धान्य 
sakal

बोलून बातमी शोधा

खिचडी ऐवजी विद्यार्थ्यांना मिळणार आता धान्य 

शैक्षणिक वर्षात शाळा संपूण्यापूर्वीच कोरोनाची लागण झाल्याने शालेय पोषण आहारही बंद होता.त्यामुळे मध्यान्ह भोजन योजनेतील तांदुळ व अन्य मालाचे वाटप विद्यार्थ्यांना सुटीत करण्यात आले होते.

खिचडी ऐवजी विद्यार्थ्यांना मिळणार आता धान्य 

sakal_logo
By
दिपक कच्छाव

मेहुणबारे (ता.चाळीसगाव): कोरानाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या मार्चपासून शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण मात्र सुरुच आहे. त्या धर्तीवर राज्य शासनाने शालेय पोषण आहारही सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र या विद्यार्थ्यांना खिचडी शिजवून न देता शिधा स्वरुपात धान्य वाटप करण्यात येणार आहे. चाळीसगाव तालुक्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या सुमारे 54 हजार विद्याथ्यार्ंंना 34 दिवसाचे धान्य वाटप केले जाणार आहे. 
 
राज्य सरकारच्या वतीने पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्याना मध्यान्ह भोजन देण्यात येते. मार्चमध्ये कोरोनाची लागण देशात सुरु झाली. त्यामुळे शाळा अर्ध्यावरच थांबवण्यात आल्या. शैक्षणिक वर्षात शाळा संपूण्यापूर्वीच कोरोनाची लागण झाल्याने शालेय पोषण आहारही बंद होता.त्यामुळे मध्यान्ह भोजन योजनेतील तांदुळ व अन्य मालाचे वाटप विद्यार्थ्यांना सुटीत करण्यात आले होते. याच पद्धतीने चालू शैक्षणिक वर्षात शिधा वाटप सुरु ठेवण्यात येत असून जुन ते ऑगस्ट या महिन्यांमधील 34 दिवसांचे तांदुळ व खिचडी शिजवण्याच्या खर्चातून अन्य धान्य देण्यात येणार आहे. 

यात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा तर सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी नऊ किलो तांदळाचे वाटप होणार आहे. चाळीसगाव तालुक्यात शालेय पोषण आहार योजनेचा लाभ घेणारे पहिली ते आठवीपर्यंत सुमारे 54 हजार विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना दर दिवसाला 100 ग्रॅम याप्रमाणे  34 दिवसांचे धान्य वाटप केले जाणार आहे. तसेच 600 ग्रॅम मुगडाळ व 1.200 ग्रॅम हरभरा असे धान्यही दिले जाणार आहे.या 54 हजार विद्यार्थ्याचे 34 दिवसांचे धान्य तालुक्यात आले असून ते सर्व शाळांना पोहच केले जात आहे. तांदुळ, हरभरा व मुगडाळ बंद पाकीटात संबंधीत शाळेतील विद्यार्थी वा पालकांना बोलावून सोशल डिस्टन्स पाळून हे धान्य वाटप केले जाईल अशी माहिती चाळीसगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विलास भोई यांनी दिली.हे धान्य 15 जून शाळा सुरु होण्यापूर्वी सुटीच्या काळातील असून 15 जून नंतरच्या धान्याची मागणी करण्यात येणार असल्याचेही श्री. विलास भोई यांनी सकाळ शी   बोलतांना सांगितले.
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top