
दहशतवादी हाल्यात आज दुपारी यश दिगंबर देशमुख यांना विरमरण आले. यश वर्षभरापूर्वीच सैन्यदलात भरती झाला होता. ट्रेनिंगनंतर त्यांची नेमणूक जम्मू काश्मीर येथे झाली आणि तेथे आपले कर्तव्य पार पाडत असतांना त्यांना वीरमरण आले.
मेहुणबारे (जळगाव) : पिंपळगाव (ता.चाळीसगाव) येथील जवान जम्मू-कश्मीरमधील अतिरेकी हल्ल्यात शहीद झाला. जम्मू- काश्मीरमध्ये झालेल्या अतिरेक्यांच्या हल्यात दोन जवानांना वीरमरण आले; त्यात चाळीसगाव तालुक्यातील यश देशमुख (वय २०) यांचा समावेश आहे.
दहशतवादी हाल्यात आज दुपारी यश दिगंबर देशमुख यांना विरमरण आले. यश वर्षभरापूर्वीच सैन्यदलात भरती झाला होता. ट्रेनिंगनंतर त्यांची नेमणूक जम्मू काश्मीर येथे झाली आणि तेथे आपले कर्तव्य पार पाडत असतांना त्यांना वीरमरण आले. यशला आधीपासून सैन्य दलाचे आकर्षण होते. त्यासाठी त्याने खूप परिश्रम घेतले आणि सैन्य दलात भरती झाला.
आई- वडीलांना सांगण्याची हिंमतच नाही
वीरमरण आलेल्या जवानांच्या पश्चात आई- वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. यश आज दुपारी दोन वाजता शहीद झाल्याची माहिती कळताच गावावर शोककळा पसरली. त्याच्या आई वडिलांना आज सायंकाळपर्यत यश देशासाठी शहीद झालेचे सागितले नव्हते. त्यांना ही बातमी सांगण्याची कुणाची हिम्मत देखील होत नव्हती.
घटनेनंतर तहसीलदार अमोल मोरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मृत यश देशमुख शहीद झाल्याची महिती त्यांना प्राप्त झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तर यशचे पार्थिव मूळ गावी (ता.२८) पर्यंत येईल असा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. पार्थिवाबाबत अधिकृत माहिती कळताच याबाबत माहिती दिली जाणार असल्याचे त्यानी कळवले आहे. यश देशमुखच्या पश्चात आई- वडील, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.
अंदाधुंदी गोळीबार
शहिद झालेला जवान यश देशमुख हा मराठा रेजिमेंट १०१ बटालियनचा जवान असल्याची माहिती मिळाली आहे. श्रीनगर येथे सुरक्षेसाठी विविध पॉइंटवर जवान तैनात केले होते. त्यातिल २ पॉइंटवर यश देशमुख आणि उत्तरप्रदेशचा जवान ज्या ठिकाणी कर्तव्य बजावत होते. तेथे अचानक तीन दहशतवादी आले आणि त्यांनी अंदाधुंदी गोळीबार करीत यश आणि सोबतच्या जवानाला गंभीर जखमी केले. यात दोघंही जवानांना वीर मरण
गावात एकही चुल पेटली नाही
दरम्यात पंचक्रोशीत शहीद जवानांच्या पार्थिवाच्या दर्शनाची आता ओढ लागली आहे. आज पीपळगाव शोकसागरात बुडाले होते एकही चूल गावात पेटली नाही दहशत वाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा सर्वत निषेध केला जात होता.
संपादन ः राजेश सोनवणे