गरिबीवर मात करून ‘प्रतीक्षा’ने आयटी क्षेत्रात यशाला घातली गवसणी

Success Story: दहावीच्या परीक्षेत ती ९५ टक्के गुण मिळवून विद्यार्थिनींमध्ये शाळेत प्रथम आली. तिने शिक्षणावर पूर्ण लक्ष केंद्रित केले.
Pratiksha gawli
Pratiksha gawliPratiksha gawli

चाळीसगाव : प्रतिकूल परिस्थितीवर (Poor situation) मात करण्यासाठी अपार परिश्रम, जिद्द या बळावर अवघे सहाशे रुपये महिन्याने काम करणाऱ्याच्या मुलीला आयटी क्षेत्रातील (IT sector Job ) नामांकित कंपनीत साडेअठरा लाखांच्या पॅकेजची नोकरी मिळाली आहे. कष्टकरी कुटुंबातील मुलींसाठीच नव्हे, तर समाजासाठी प्रेरणादायी ठरली आहे. आपल्या वडिलांच्या गरिबीची आणि मेहनतीची जाणीव ठेवून मुलीने मिळविलेल्या या यशामुळे तिच्यासह तिच्या कुटुंबीयांचेही सर्वत्र कौतुक होत आहे.

(chalisgaon poor situation family girl success by it sector job)

Pratiksha gawli
महसूलचा अफलातून प्रताप..कर्जच घेतले नाही तरी उताऱ्यावर नोंद


प्रतीक्षा गणेश गवळी असे या तरुणीचे नाव असून, ती अवघ्या नऊ वर्षांची असताना, आजारामुळे तिचे मातृछत्र हरपले. दोन लहान भावंडेही असल्याने त्यांच्या संगोपनाची जबाबदारी साहजिकच चिमुरड्या प्रतीक्षावर आली. वडील गणेश गवळी गॅस एजन्सीत सिलिंडर उचलण्याचे काम करायचे. तब्बल बारा वर्षे त्यांनी ही नोकरी केली. त्यांना सुरवातीला अवघा ६०० रुपये पगार होता. नंतर तो अठराशे झाला. त्यावर त्यांनी लहान मुलांचे संगोपन केले. मुलांची हेळसांड होऊ नये, म्हणून गणेश गवळी यांनी नातेवाइकांच्या आग्रहाखातर दुसरे लग्न केले. प्रतीक्षासह तिच्या दोघा भावंडांना वैशाली गवळी ही नवी आई मिळाली. वैशाली यांनीही अल्पावधीतच या मुलांना आपलेसे करून घेतले. त्यांना अत्यंत मायेने वाढविले व कधीही परकेपणा भासू दिला नाही. त्यामुळे प्रतीक्षाचे अभ्यासात मन रमू लागले. दहावीच्या परीक्षेत ती ९५ टक्के गुण मिळवून विद्यार्थिनींमध्ये शाळेत प्रथम आली. तिला अभ्यासाची लागलेली गोडी पाहून गणेश गवळी यांनीही तिच्या शिक्षणावर पूर्ण लक्ष केंद्रित केले. सांगली येथील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ‘इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी’ या अभ्यासक्रमासाठी तिने प्रवेश घेतला. मागील वर्षी या महाविद्यालयामध्ये ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली.


नामांकित कंपनीत नोकरी
महाविद्यालयात झालेल्या ‘कॅम्पस इंटरव्ह्यू’मध्ये व्हेरिटास कंपनीने तिला १० लाख ७५ हजारांच्या पॅकेजची नोकरी दिली. कंपनीत प्रतीक्षा अत्यंत मन लावून काम करू लागली. कोरोना काळात ‘वर्क फ्रॉम होम’ करून तिने कंपनीचे काम निष्ठेने केले. सुमारे सहा महिने तिने काम केल्यानंतर तिला अरिस्टा या कंपनीची ऑफर आली. प्रतीक्षाने या कंपनीचाही इंटरव्ह्यू दिला आणि त्या ठिकाणी ती पात्र ठरली. या कंपनीने प्रतीक्षा चक्क १८ लाख ५० हजारांच्या पॅकेजची नोकरी दिली. प्रतीक्षाच्या या यशामुळे तिच्या आई-वडिलांना झालेला आनंद गगनात मावेनासा आहे. गवळी समाजात एवढे मोठे पॅकेज घेणारी चाळीसगावातील नव्हे, तर जळगाव जिल्ह्यातील प्रतीक्षा एकमेव तरुणी ठरली आहे.

Pratiksha gawli
उपमहापौरांवर नक्की गोळीबार झाला का? कुठल्याही खाणाखुणा नाही

धाडिवाल यांची खंबीर साथ
दरम्यान, गणेश गवळी यांना सामाजिक कार्यकर्ते वर्धमान धाडिवाल यांची साथ मिळाली. हे दोघे मित्र म्हणजे जणू एकमेकांसाठी राम-लक्ष्मणच. प्रतीक्षा अभ्यासात आपली चुणूक दाखवत असल्याने श्री. धाडिवाल यांनी वेळोवेळी तिला मार्गदर्शन केले.


माझ्या कष्टाचे मुलीने चीज केले. वर्धमान धाडिवाल यांची भक्कम साथ प्रतीक्षाला या यशापर्यंत घेऊन आली. प्रतीक्षाची आणखी उत्तरोत्तर प्रगती होवो, हाच तिला आमचा आशीर्वाद आहे.
-गणेश गवळी, चाळीसगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com