esakal | पुढे चोऱ्या होत आहे, असे सांगून वृध्देजवळील दिड तोळ सोने लांबवले !
sakal

बोलून बातमी शोधा

पुढे चोऱ्या होत आहे, असे सांगून वृध्देजवळील दिड तोळ सोने लांबवले !

भामटयांच्या सांगण्यावरून वृद्धेने आपल्या बोटातील अंगठी आणि मन्यांची पोत असे दीड तोळे सोन्याचे दागिणे काढून घेतले व पुडी बांधली.

पुढे चोऱ्या होत आहे, असे सांगून वृध्देजवळील दिड तोळ सोने लांबवले !

sakal_logo
By
दिपक कच्छवा

मेहुणबारे (ता.चाळीसगाव): बँकेत पेन्शन घेण्यासाठी रस्त्याने पायी जाणाऱ्या 65 वर्षीय वृद्धेला दुचाकीवरून आलेलल्या तिघा भामट्यांनी पुढे चोऱ्या होत असून तुमच्या अंगावरील सोन्याचे दागिणे काढून ते कागदाच्या पुडीत बांधून ठेवा असे सांगत हातचालाखी करून  वृद्धेजवळील सुमारे दीड तोळ्यांचे सोन्याचे दागिणे दिवसाढवळ्या हातोहात लंपास केल्याची घटना शहरातील भडगाव रोडवरील मीलच्या पुढे शास्त्रीनगर कॉर्नरवर घडली.

वाचा- पून्हा चिंता वाढली; कोरोना बाधीत रुग्ण आणि मृत्यू वाढले -
 

चाळीसगाव येथील शास्त्रीनगर मधील वृद्धा सुशिलाबाई दौलत पाटील(वय65)ह्या आज बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास बँकेत पेन्शनची रक्कम काढण्यासाठी पायी जात होत्या. भडगाव रोडवरील शास्त्रीनगर कॉर्नरजवळ मोटारसायकलवरून तिघे भामटे आले व त्यांनी या वृद्धेस पुढे चोऱ्या होत आहेत. तुमच्या जवळ जेवढे सोने असेल ते काढून एका पुडीत बांधून घ्या अशी बतावणी केली. तिघा भामटयांच्या सांगण्यावरून वृद्धेने आपल्या बोटातील अंगठी आणि मन्यांची पोत असे दीड तोळे सोन्याचे दागिणे काढून घेतले व पुडी बांधली. तिघा भामट्यापैकी एकाने त्याच्याजवळील एक वस्तु काढून वृद्धेकडे गेले व महिलेकडील दागिणे घेऊन पळ काढला. 

बनावट दागिने दिले

या वृध्देला भामट्यांनी दिलेले सोन्याचे दागिने बनावट असल्याने ही वृद्धा घाबरली.तिने घरी धाव घेऊन ही आपबित्ती सांगितली. त्यानंतर वृद्धेने शहर पोलीस स्टेशनला धाव घेऊन घडलेला प्रकार पोलीसांना सांगितला. याप्रकरणी वृद्धेच्या फिर्यादीवरून अज्ञात भामट्यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस पुढील तपास करीत आहेत.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी
 
दरम्यान दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्याने पोलीसांनी या घटनेची नोंद होताच तपास सुरु केला असून ही घटना जेथे घडली त्या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून चोरट्यांचा काही माग लागतो का याचा शोध घेत आहेत.


दिवसाढवळ्या धाडस

गेल्या काही दिवसापासून शहरात चोरट्यंानी धूम केली आहे.गत महिन्यात शास्त्रीनगर भागातूनच पती पत्नी खरेदीनिमीत्त घराबाहेर पडले आणि ही संधी साधून चोरट्यांनी दिवसाढवळ्या घरात घुसून किंमती ऐवज लुटून नेला होता. त्यापाठोपाठ आता पुन्हा दिवसाढवळ्या वृद्धा एकटी जात असल्याचा फायदा घेऊन दुचाकीवरून आलेल्या तिघा भामट्यांनी वृद्धेला दागिण्यांची चोरी होत असल्याची बतावणी करून महिलेकडील दीड तोळ्याचे  सोन्याचे दागिने लंपास केल्याने परिसरासह शहरात एकच खळबळ उडाली आहे.

loading image