पुण्यावरून दिवाळीला घरी येत होता, दुदैवी घटनेचा निरोप येताच गावावर पसरली शोककळा 

दिपक कच्छवा
Sunday, 15 November 2020

ट्रकचालकाने ट्रक जोरात चालवत मोटारसायकलीस पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यात भूषण पाटील याच्या डो्नयाला व हातापायाला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव): नोकरीनिमीत्त पुण्यात असलेला मांदुर्णे (ता.चाळीसगाव) येथील 26 वर्षीय तरूण दिवाळीनिमीत्त मोटारसायकलने घरी येत असतांनाच कन्नड घाटात ट्रकने मागून धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला.एैन दिवाळीत या दुर्देवी घटनेने मांदुर्णेत शोककळा पसरली आहे. याप्रकरणी ट्रक चालकाच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मांदूर्णे (ता.चाळीसगाव) येथील भूषण हरीचंद्र पाटील (वय26) हा तरुण पुणे येथे नोकरीस होता. दिवाळीनिमीत्त तो (एमएच.18 टी.6338) या मोटारसायकलने पुण्याहून औरंगाबाद मार्गे घरी येत होता. शुक्रवार (ता.13 )रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास कन्नड घाटात मेणबत्ती पॉईन्टजवळ त्याच्या मोटारसायकलीला मागाहून भरधाव वेगाने येणाऱ्या (आरजे.19 ई-9494) या ट्रकचालकाने ट्रक जोरात चालवत मोटारसायकलीस पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यात भूषण पाटील याच्या डो्नयाला व हातापायाला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. अपघात होताच ट्रक चालक पळून गेला.

या अपघाताची माहिती महामार्ग पोलीसांना कळाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली व भूषण पाटील यास रूग्णवाहीकेतून ग्रामीण रूग्णालयात नेले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषीत केले.याप्रकरणी विष्णु बाजीरा व पाटील रा. मांदूर्णे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

संपादन- भूषण श्रीखंडे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon two-wheeler killed in truck collision in kannada ghat