esakal | मुलांच्या कपड्यासाठी पैसे कमी दिले आणि विवाहितेने जीवनच संपविले
sakal

बोलून बातमी शोधा

मुलांच्या कपड्यासाठी पैसे कमी दिले आणि विवाहितेने जीवनच संपविले

मुलांच्या कपडे खरेदीकरीता पैसे कमी दिल्याचा राग येवून स्वत:च्या घरी छताचे लाकडी खांबास साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

मुलांच्या कपड्यासाठी पैसे कमी दिले आणि विवाहितेने जीवनच संपविले

sakal_logo
By
दिपक कच्छवा

मेहुणबारे (ता.चाळीसगाव): दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुलांना कपडे घेण्यासाठी घरच्यांनी कमी पैसे दिले  याचा राग येवून 32वर्षीय विवाहीतेने छताला साडीने गळफास लावून आत्महत्या केली. ही दुर्देवी घटना तालु्नयतील मेहूणबारे येथे घडली. या दुर्देवी घटनेने मयत विवाहीतेचे मुलांसह कुटुुंब मात्र उघड्यावर पडले.

वाचा- मामाच्या घरी भाऊबीजला भाचा आला आणि शेततळ्यात जीव गमावून बसला -

मेहूणबारे (ता.चाळीसगाव) बजार पट्टा भागात राहणाऱ्या सिमा उर्फ जिजाबाई गोरख सोनवणे (वय32) हिने मुलांच्या कपडे खरेदीकरीता पैसे कमी दिल्याचा राग येवून स्वत:च्या घरी छताचे लाकडी खांबास साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्देवी घटना  दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास नुकतीच घडली. याप्रकरणी गोरख दगा सोनवणे यांनी दिलेल्या खबरीवरून मेहूणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास एएसआय जालमसिंग पाटील हे करीत आहेत.

ऐन दिवाळीच्या घटनेने समाजमन सुन्न

कोरोनाच्या संकटातही दिवाळी सारखा सण गोडधोड करण्यासाठी सर्वत्र धडपड सुरु असतांना केवळ मुलांच्या कपड्यासाठी कमी पैसे मिळाल्याने विवाहीतेने कायमचे जीवनच संपविल्याने मेहूणबाऱ्यासह परिसरात समाजमन सुन्न झाले आहे.जिजाबाईच्या आत्महत्येने तिच्या मुलांसह परीवारच उघड्यावर पडला आहे. या दुर्देवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे