डॉ. आंबेडकरांची रक्षा घेण्यासाठी झेलल्या होत्या अंगावर काठ्या

Dr. Babasaheb Ambedkar News : ६ डिसेंबर १९५६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांच्या अस्थिरक्षा घेण्यासाठी चैत्यभूमीवर गेले होते.
Ossuary Kalash
Ossuary KalashOssuary Kalash


चाळीसगाव ः येथील आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या (Dr. Babasaheb Ambedkar) पुतळ्याचे नूतनीकरण सुरू असताना मिळून आलेला अस्थिकलश (Ossuary Kalash) आपल्या वडिलांनी बनारस येथून आणला होता. मुंबईत (Mumbai) चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेबांच्या अस्थी व रक्षा घेण्यासाठी प्रचंड गर्दी झाल्याने वडिलांसह त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांच्या काठ्या अंगावर झेलल्या होत्या. आजही या कलशावर आपली आई ‘इंद्रायणीबाईंचे नाव आहे’, अशी माहिती मिलिंद वाघ व ज्योतिबा वाघ या बंधूंनी खास ‘सकाळ’ला दिली.

( dr babasaheb ambedkar ash taken he was beaten police)

Ossuary Kalash
‘मेडिकल हब’; दोनदा ‘डीपीआर’ बदल्ला तरी प्रस्ताव प्रलंबितच!


शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे नूतनीकरण करताना पुतळ्याच्या खाली गुरुवारी (२२ जुलै) दोन अस्थिकलश मिळून आले होते. याविषयीचा खरा इतिहास नव्या पिढीला कळावा तसेच यामागील सत्य समोर यावे, यासाठी ज्यांनी हा कलश आणला होता, त्या स्वर्गीय पुंडलिक वाघ यांचे पुत्र मिलिंद व ज्योतिबा वाघ यांनी ‘सकाळ’च्या प्रतिनिधीशी संवाद साधला.
वाघ बंधूंनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षक असलेले त्यांचे वडील पुंडलिक वाघ १९५१ मध्ये उत्तर भारतात यात्रा दर्शनासाठी गेले होते. त्यांच्या भगिनी व ब्रिटिशकाळात महाराष्ट्रातील पहिल्या मागासवर्गीय महिला नगराध्यक्षा राहिलेल्या तान्हाबाई पवार यांनी बनारस येथून गंगेचे पाणी आणण्याचे सांगितले. वडिलांनी गंगेचे पाणी घेण्यासाठी तांब्याचा कलश बनारसला विकत घेतला. त्यावर पुंडलिक वाघ यांनी पत्नी इंद्रायणीबाई यांचे नाव टाकले. गंगेचे पाणी तान्हाबाईंना दिल्यानंतर हा आमच्याकडेच होता.

Ossuary Kalash
पूर तुमचा; पूर आमचा चिखल मात्र सारखाच


मुंबईत काठ्या झेलल्या होत्या...
६ डिसेंबर १९५६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांच्या अस्थिरक्षा घेण्यासाठी पुंडलिक वाघ व त्यांचे काही मित्र दादरला चैत्यभूमीवर गेले होते. देशभरातून अनुयायींची गर्दी झाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला. पुंडलिक वाघ यांनीही त्या काठ्या झेलेल्या. त्यामुळे त्यांच्या शरीरात रक्ताच्या गाठी झाल्या होत्या. बनारस येथून विकत घेतलेल्या त्या कलशात अस्थिरक्षा घेऊन ते चाळीसगावला आले.


पुतळ्यासाठी होती समिती
त्याकाळी आता आहे, तशी परिस्थिती नसल्याने याविषयी त्यांनी फार कोणाला माहिती दिली नाही. हा अस्थिकलश पुंडलिक वाघ यांच्या घरीच सुरक्षित ठेवला होता. १९६० मध्ये माजी वनमंत्री डी. डी. चव्हाण यांचे वडील दिवाणसाहेब यांच्याजवळ पुंडलिक वाघ व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचा प्रस्ताव मांडला. त्यानुसार समिती गठीत करण्यात आली. ज्याचे अध्यक्ष स्वतः दिवाण चव्हाण होते. समितीत श्‍यामा जाधव, सजन जाधव, त्र्यंबक जगताप, आशरू जाधव, भावराव अहिरे, लहू जाधव यांच्यासह इतरही काही जणांचा समावेश होता.

Ossuary Kalash
भारतातील या टॉय ट्रेनमधून प्रवासाचा आनंद एकदा तरी घ्या


असे ठेवले होते दोन्ही कलश
पुतळ्यासाठी पिलखोड व चाळीसगावच्या दोन जागा निश्‍चित झाल्या. पुतळ्यासाठी पुंडलिक वाघ यांनी पत्नीचे मंगळसूत्र येथील सराफ सायरचंद मोतीलाल जैन यांच्याकडे गहाण ठेवले. पुतळ्याचे प्रत्यक्षात काम सुरू झाले, त्या वेळी वडिलांजवळ असलेला डॉ. बाबासाहेबांचा अस्थिरक्षा कलश पुतळ्यासाठी ठेवण्यात आला. समितीनेही आपली काही तरी आठवण असावी म्हणून दुसरा लहान कलश ठेवला. जे दोन्ही कलश पुतळ्याच्या नूतनीकरणावेळी मिळून आले. ही माहिती आमच्या वडिलांनी आम्हाला लहानपणीच सांगितली होती, असे मिलिंद व ज्योतिबा वाघ यांनी सांगितले. मिळून आलेल्या कलशावर ‘इंद्रायणीबाई पुंडलिक वाघ’ हे नाव जसेच्या तसे असल्याने हाच खरा त्यामागील इतिहास असून, तो समोर आला पाहिजे, या उद्देशाने ही माहिती आपल्याला देत असल्याचे वाघ बंधूंनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com