महामार्गावरील खड्यांवर..ठाणेदार ठेवणार लक्ष

महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम मार्गी लागत नसल्याने केवळ डागडुजी सुरू आहे.
महामार्गावरील खड्यांवर..ठाणेदार ठेवणार लक्ष



मेहुणबारे (ता.चाळीसगाव)ः चाळीसगाव-धुळे महामार्गाची (Highway) अंत्यत दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता जीवघेणा बनला आहे. या जीवघेण्या खड्ड्यांमधून मार्ग काढतांना वाहनधारकांची अक्षरशा त्रेधा उडत असतांना ठेकेदाराकडून मात्र थातूर मातूर काम करून खड्डे (Pits in the road) बुजवले जात आहेत. खड्ड्यांचा हा घाव वाहनधारकांना सोसवत नसल्याने कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या मेहूणबारे पोलीसांनी सामाजिक दायित्व निभावत या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी यापूर्वीही मदतीचा हात दिला असतांना व आताही खड्डे बुजवले जात असतांना सहाय्यक निरीक्षक (Police) पवन देसलेंनी रस्त्यावर जावून खड्डे चांगले बुजवले जात आहे की नाही याची माहिती घेतली. ठाणेदारांच्या या वॉचमुळे किमान खड्डे तरी चांगले बुजवले जातील अशी अपेक्षा आहे.

महामार्गावरील खड्यांवर..ठाणेदार ठेवणार लक्ष
प्रत्येक एमआयडीसीत लॉजिस्टिक हब-उद्योगमंत्री देसाई


चाळीसगाव ते धुळे महामार्गाची गेल्या तीन चार वर्षापासून अक्षरशा धुळधान उडाली आहे. रोजच अपघात होतात अशी स्थिती आहे आतापर्यंत शेकडो अपघात होवून असंख्यांचा बळी गेला आहे. मात्र त्याकडे महामार्ग प्राधिकरणाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम मार्गी लागत नसल्याने केवळ डागडुजी सुरू आहे. तीन चार वर्षात या मार्गावर खड्डे बुजवण्यासाठी कोट्यावधी रूपये खर्च करण्यात आले आहेत.


रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता

रस्त्यांमध्ये इतके खड्डे झालेत की रस्त्यात खड्डा आहे, की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही. अपघाताच्या घडणाऱ्या घटना पाहता मेहूणबारे पोलीसांकडून वाहनधारक तसेच नागरीकांची सतत जनजागृती केली जाते. यापूर्वी या मार्गावरील अपघात रोखण्यासाठी मेहुणबारे पोलिसांनी खड्डे बुजवण्यास सहकार्य केले होते, मात्र सततच्या पावसामुळे ही वाहुन जावून पुन्हा खड्डे तयार झाले होते. आताही चाळीसगाव-धुळे रस्त्यावर खड्डे बुजवण्याचे काम सुरू असतांना ते थातूरमातूर होवू नये यासाठी मेहूणाबारे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी जातीने लक्ष घालत आहेत. रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांतून वाट काढताना वाहनचालकांचा अपघात होऊ नये,यासाठी चांगले खड्डे बुजवले जावेत अशी भूमिका यामागची असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी सकाळ शी बोलतांना सांगितले.



पोलीसांचे आवाहन
अपघात हे सांगून होत नसतात, परंतु ते टाळणें अथवा झाल्यास इजा होऊ नये व कमीतकमी व्हावी यासाठी मात्र आपण काळजी घेणें गरजेचें आहे.तसेच अपघात झाल्यास त्वरित काय उपचार करावेत हेही तितकेच महत्त्वाचे आहे.असे देसले यांनी सांगितले. हेल्मेट नियमित वापरणे, दारु पिऊन वाहन चालवू नये,दुचाकी चालक यांनी श्यक्यतो रात्रीचे किंवा पावसात प्रवास टाळावा. वाहन चालवितांना वेगावर नियंत्रण ठेवा.वाहन चालवीतांना मोबाईल वर बोलू नये.मोठे वाहन चालवितांना वाहन कंडिशन मध्ये ठेऊन प्रवासी संख्या नियम नुसार असावी.योग्य वेळी हॉर्न व लाईटचा वापर करावा.वाहन चालवीतांना स्पर्धा करू नये.ओव्हरटेक करतांना सुरक्षित अंतर व साईड मिरर.हॉर्न चा वापर करूनच ओव्हर टेक करावे वळणावर ओव्हर टेक केल्यावर अपघात होण्याची शक्यता आहे.लहान मुले,वृद्ध यांना घेऊन टू व्हीलर वर प्रवास करू नये.सिटबेल्ट लावूनच वाहन चालविणे असे नियम पाळणे गरजेचे आहे असे आवाहन श्री. देसले यांनी केले आहे.

महामार्गावरील खड्यांवर..ठाणेदार ठेवणार लक्ष
फटाके उडवा..मात्र डोळे जपा; दुर्घटनांचा धोका!


अपघात टाळण्यासाठी पोलीसांकडून जनजागृती केली जात आहे. नियम न पाळणाऱ्यांंवर कडक कारवाई केली जात असुन जर कुणी वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम मोडले तर यापुढे देखील कडक कारवाई करण्यात येईल.

-पवन देसले, साहाय्यक पोलीस निरीक्षक मेहुणबारे, (ता.चाळीसगाव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com