
शेतकरी कुटूंब गाढ झोपेत; चोरट्यांची घरात घुसून धाडसी चोरी
पाचोरा : चिंचखेडा बुद्रुक (ता पाचोरा) येथे शेतकरी कुटुंबीय (Farmer) ओट्यावर झोपलेले असताना चोरट्यांनी (Thieves) घरात घुसून लॉकर मधील रोकड (cash) व दागिन्यांसह (Jewelry) 3 लाख 50 हजारांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी पोलिसांनी (Police) अज्ञात चोरट्यां विरूध्द गुन्ह्याची नोंद केली आहे. (chinchkheda villege farmer hoom theft)
चिंचखेडा बुद्रुक येथे शेतकरी कुटुंबीय ओट्यावर झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी मोठ्या शिताफीने उशी खालून चावी काढून दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटातील लॉकर उघडून 1 लाख 70 हजार रुपयांची रोकड व 1 लाख 80 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण 3 लाख 50 हजारांचा ऐवज लांबवला.
पोलिसांनी श्वानपथक तसेच ठसे तज्ञ मागवून पोलिसांचा माग घेतला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी भरत काकडे, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे, विकास पाटील, पोलीस हवलदार वसंत पाटील ,प्रशांत चौधरी, राहुल सोनवणे, किरण पाटील, नायब तहसीलदार पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली .पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास उपनिरीक्षक विकास पाटील करीत आहेत. या धाडसी चोरीमुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड भिती पसरली आहे.