esakal | रूढी परंपरांना छेद देत लहान मुलीने पित्याच्या पार्थिवाला दिला अग्नीडाग 
sakal

बोलून बातमी शोधा

रूढी परंपरांना छेद देत लहान मुलीने पित्याच्या पार्थिवाला दिला अग्नीडाग 

वडिलांच्या अखेरच्या प्रवासाच्या पालखीस खांदा देत व आग्याची भूमिका बजावत चितेवरील पार्थिवास अग्नीडाग देऊन अखेरचा निरोप दिला.

रूढी परंपरांना छेद देत लहान मुलीने पित्याच्या पार्थिवाला दिला अग्नीडाग 

sakal_logo
By
रोहिदास मोरे

अडावद ः अडावद (तालुका चोपडा) येथील कोठारी नगर मधील रहिवासी व सार्वजनिक विद्यालयातील सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक शशिकांत भगवंतराव देशमुख (वय 61) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.  त्यांच्यावर नुकताच अडावद येथील वैकुंठधामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी अंत्ययात्रेत त्यांच्या मोनाली, सोनाली व रागिनी या तिन्ही मुलींनी खांदा दिला. तर लहान मुलगीने पित्याच्या पार्थिवास आपल्या हातून अग्निडाग दिला. त्यावेळी अंत्ययात्रेतील उपस्थितांचे डोळे भरुन आले होते.

वाचा- सातपुड्यातील आदिवासींच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद 

शशिकांत भगवंतराव देशमुख हे गेल्या दोन महिन्यांपासून खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने नुकतेच त्यांची प्राणज्योत मालवली. शशिकांत देशमुख यांना मुलगा नसल्याने त्यांनी तिन्ही मुलींना मुलां समान वागणूक देऊन तिन्ही मुलींना उच्च शिक्षण दिले त्या तिघी मुली कंप्यूटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्या असून मोठी मुलगी मोनाली हिचा विवाह डिसेंबर 2018 साली झाला असून, अजून दोघं लहान मुली अविवाहित आहेत.

भेदभाव न करता दिले मुलाचे स्थान
वंशाला केवळ मुलगा असल्यानेच हे सोपस्कार करण्याच्या त्याला अधिकार असल्याचे समाजमनात प्रथा रूढ होती मात्र बदलत्या युगात मुलगा - मुलगी हे दोघे समान त्यात भेदभाव न करता मुलींना मुलांचे स्थान देऊन अडावद येथील देशमुख परिवाराने नवीन आदर्श निर्माण केला आहे .

खांदा, अग्निडाग मुलींना दिला 

आपल्या स्वर्गीय पित्यास रागिणी देशमुख हिने सर्व रूढी परंपरांना छेद देत आपल्या वडिलांच्या अखेरच्या प्रवासाच्या पालखीस खांदा देत व आग्याची भूमिका बजावत चितेवरील पार्थिवास अग्नीडाग देऊन अखेरचा निरोप दिला .
मयत शशिकांत देशमुख यांच्या पश्चात पत्नी सुनीता देशमुख , तीन मुली व दोन बहिणी असा परिवार आहे . ग्रामीण भागात पित्याच्या पार्थिवास मुलींकडून अग्निडाग दिला. 

संपादन- भूषण श्रीखंडे