
दोघांवर कोयत्याने वार केल्याने त्यात दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना निमगव्हाण येथील बसस्थानकासमोर घडली.
अडावद ः म्हैस विक्रीचे पैसे मागितल्याचा राग आल्याने अमळनेर येथील दोघांवर कोयत्याने वार केल्याने त्यात दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना निमगव्हाण येथील बसस्थानकासमोर घडली. मारहाण प्रकरणी चोपडा येथील पिता पुत्रांवर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आवश्य
वाचा- वन विभागाला पक्षी सप्ताहाचा पडला विसर, अन्यथा दुर्मीळ प्रजातींची झाली असती नोंद !
अमळनेर शहरातील पैलाड भागातील रहिवाशीपंकज सुकदेव कंखरे यांनी चोपडा येथील भरत हिंमत चौधरी यास गेल्या वर्षापूर्वी पाच म्हशी विकल्या होत्या त्या सौद्यापोटीचे 4 लाख 85 हजार रुपये घेणे बाकी होते. भरत चौधरीकडे वेळोवेळी पैशाची मागणी करून पैसे देत नव्हते. पंकज कंखरे हे म्हशी विक्रीचे पैसे मागण्यासाठी गेले असता त्याचा भरत चौधरी याला राग आल्याने चौधरी याने ट्रॅक्टर मधील कोयता काढून सोबत असलेले भिल व पंकज कंखरे वार केले.
पोलिसात गुन्हा दाखल
या प्रकरणी पंकज सुकदेव कंखरे रा.पैलाड अमळनेर यांच्या फिर्यादीवरून भरत हिंमत चौधरी व त्याचा मुलगा भैय्या भरत चौधरी रा. चोपडा शहर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास डीवायएसपी राजेंद्र रायसिंग व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ भरत नाईक करीत आहेत.
संपादन- भूषण श्रीखंडे