
शासनाने योजना जाहीर करताना दोन लाखांच्या आतील, वरील व नियमित कर्जफेड करणारे शेतकरी अशा तीन टप्प्यांत ही योजना जाहीर केली होती.
गणपूर (ता. चोपडा) : शासनाने जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी कोरोना काळात रखडल्याने दोन लाखांवरील कर्जदार आणि नियमित कर्जफेड करणारे शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या प्रतीक्षेतच आहेत.
शासनाने योजना जाहीर करताना दोन लाखांच्या आतील, वरील व नियमित कर्जफेड करणारे शेतकरी अशा तीन टप्प्यांत ही योजना जाहीर केली होती. त्यापैकी दोन लाख रुपयांच्या खालील कर्जदार शेतकऱ्यांच्या व्यवहारांची अंमलबजावणी झाली. मात्र, दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज घेणारे शेतकरी आणि नियमित कर्जफेड करणारे कर्जदार शेतकरी या कर्जमाफी योजनेपासून अजूनही वंचितच राहिले असून, या संबंधीच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सुट मिळेल म्हणून कर्जफेड नाही
सूट मिळेल, या आशेवर दोन लाखांवरील कर्जदार शेतकऱ्यांनी भरणा थांबविल्याने एकीकडे सूट मिळेल, या आशेवर कर्जफेड केली नाही आणि दुसरीकडे व्याजाचा बोजा वाढवून घेतला आहे. तर मार्चपूर्वी दुसऱ्यांकडून रक्कम उचलून किमान पन्नास हजार रुपयांची सूट मिळेल, या आशेवर नियमित कर्जफेड शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र, शासनाचा यावरील निर्णयास होणारा विलंब शेतकऱ्यांची चिंता वाढविणारा ठरला आहे.
संपादन ः राजेश सोनवणे