
गेल्या पंधरवड्यात कांद्याचे जागेवरील भाव 300 ते 340 रुपये प्रति गोणी होते ते आज 250ते 300 रुपये झाले आहेत.
गणपूर (ता चोपडा) : खानदेशात मोठ्या प्रमाणावर लागवड झालेल्या उन्हाळी कांद्याच्या काढणीला गेल्या पंधरा दिवसापासून सुरवात झाली असून हा हंगाम मध्यावर आला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाजारावर झालेला परिणाम लक्षात घेता भावात घसरण झाल्याने उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
आवश्य वाचा- कलियुगातील आधुनिक श्रावण बाळाचा असाही शेवट
यावर्षी कधी नव्हे एव्हडी बियाणे टंचाई होती .त्यामुळे घरगुती बियाणे 1800 ते 2400 रूपये प्रतिकिलो तर कंपन्यांचे बियाणे 2200 ते 4400 रुपये किलोप्रमाणे विक्री झाले होते.मात्र एवढे महाग बियाणे घेऊनही शेवटी कांदा कमी दरात विकण्याची वेळ उत्पादकांवर आली आहे. खानदेशात साक्री ,शेवाळे ,निजामपूर ,जैताने,फोफादे, दुसाने ,कढरे ,छडवेल,गोताने, लामकणी, चिंचवार, बोरिस ,सरवड ,शहादा ,गणपूर ,लासुर ,अडावद मंगरूळ,माचला ,वरडी ,चिंचोली ,किनगाव,नायगाव,चुंचाळे ,धरणगाव ,एरंडोल,गांधली ,पिळोदे ,आदी भागात कांद्याचे उत्पादन घेतले जाते.
हंमागात कांद्याची घसरण
गेल्या पंधरवड्यात कांद्याचे जागेवरील भाव 300 ते 340 रुपये प्रति गोणी होते ते आज 250ते 300 रुपये झाले आहेत.एक महिन्यांपूर्वी 3 मार्च ला लासलगाव बाजारात उन्हाळ कांदा 1300 ते 2926 रुपये प्रतिक्विंटल होता तो आज700 ते 1101 रुपयांपर्यंत खाली आला असून आजची आवक 1800 क्विंटलची होती. ऐन हंगामात भावात घसरण झाल्याने खर्च निघणे कठीण झाले आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे