भरड धान्य खरेदी केंद्र चालू करा..पालकमंत्रीच्या दारी आंदोलन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भरड धान्य खरेदी केंद्र चालू करा..पालकमंत्रीच्या दारी आंदोलन!

भरड धान्य खरेदी केंद्र चालू करा..पालकमंत्रीच्या दारी आंदोलन!


चोपडा : मागील दोन महिन्यापासून भरड धान्य खरेदी (coarse grains center) करण्यासाठी सरकारने नोंदणी करून घेतली मात्र मे महिना संपण्यात आला तरीही भरड धान्य खरेदीकेंद्र चालू होत नाही. रब्बीचा हंगाम (Rabbi's season) संपून दोन महिने झाले शेतकऱ्यांनी (farmers) मोठ्या आशेने भरड धान्य खरेदी केंद्रांवर आपला शेतमाल हमीभाव (Farm grains) विकला जाईल म्हणून पहाटे चार वाजेपासून रांगेत उभे राहून नोंदणी करून घेतली. मात्र आज दोन महिने उलटूनही भरडधान्य खरेदीचे आदेश शासन काढत नाही. तेव्हा भरड धान्य खरेदी केंद्र लवकरात लवकर चालू करा, अन्यथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरासमोर टाळी व थाली बजाव आंदोलन करू असा इशारा (Movement warning ) शेतकरी संघटनेने (Farmers Association) दिला आहे.(farmers-association-grains-center-start-otherwise-movement-warning)

शासनाने एकीकडे बि टी बियाण्याचे दर वाढवलेत.रासायनिक खतांचे दर वाढ केली डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरने मशागतीचे दरवाढ केली व दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाला कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये व्यापारी कवडीमोल भावाने खरेदी करतांना दिसत आहे.शेतकऱ्यांच्या घरात शेतमाल आला की, खाजगी सावकार तसेच बियाणे दुकानदार यांचा उधारी मागण्यासाठी शेतकऱ्यांच्या मागे तगादा सुरू होतो. शासनाच्या उदासीनतेमुळे जिल्हाभरातील एकही शेतकऱ्यास हमीभाव मिळतांना दिसत नाही. खरीप हंगाम तोंडावर येऊन ही रब्बी हंगामातील शेतमाल घरात पडून असल्याकारणाने शेतकऱ्यांना जमिनीची मशागत बियाणे व खते घेण्यासाठी पैशांची भरपूर टंचाई भासत आहे. वरून आणखी बियाण्याची दरवाढ तसेच रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या अंगावर पडत आहे.

चुकीच्या धोरणांमूळे शेतकरी त्रस्त

या कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतलेल्या शासनाला त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे अजून किती शेतकऱ्यांचे बळी घ्यायचे आहेत हेच कळत नाही. यावर शेतकरी संघटना आंदोलन करण्याचा पवित्रा घेणार असून दहा दिवसात जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शासनाकडून भरड धान्य खरेदी चे आदेश आणावेत अन्यथा येत्या दहा दिवसात पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरासमोर टाळी व थाली बजाव आंदोलन शेतकरी संघटना करणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष किरण गुजर, तालुकाध्यक्ष सचिन शिंपी यांनी दिला आहे.

(farmers-association-grains-center-start-otherwise-movement-warning)

loading image
go to top