नागरिकांच्या मदतीतून चोपडा कोविड सेंटरला ऑक्‍सिजन पाइप

नागरिकांच्या मदतीतून चोपडा कोविड सेंटरला ऑक्‍सिजन पाइप
Updated on

चोपडा  : येथील कोविड रुग्णालय म्हणून उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी चांगली व्यवस्था असली तरी रुग्णाच्या बेडला जोडणारी संयुक्त ऑक्‍सिजन पाइपलाइन नसल्याने बऱ्याच रुग्णांना जळगाव येथे हलवावे लागत असल्याने निव्वळ ऑक्‍सिजन पुरवठ्याअभावी कोविड केंद्रात अडचणी येत होत्या. त्यासाठी कोरोना मुक्त अभियान हा व्हॉट्‌सअप ग्रुप आवाहन केले त्याला प्रतिसाद देत 1 लाख 11 हजार एकशे अकरा एवढी रक्कम आज तहसीलदार अनिल गावित यांच्याकडे शेतकरी कृती समितीचे एस. बी. पाटील, मयूर शिंदे, रमाकांत सोनवणे, सी. एस. पाटील यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली. 

कोरोना रुग्णांना ऑक्‍सिजन पुरवठा हा मेडिसीन पेक्षाही महत्त्वाचा आहे. या ऑक्‍सीजनअभावी अडावद येथील एका डॉक्‍टरचा मृत्यू झाल्याचे त्यांचा मुलगा याने माहिती दिली होती. अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. पंकज पाटील यांनी चोपडा कोविड सेंटर मध्ये लोकसहभागातून ऑक्‍सिजन कॉन्सनट्रेटर आणि प्रत्येक बेडला ऑक्‍सिजनची व्यवस्था झाली तर कोरोना ग्रस्त रुग्णांना जळगाव येथे पाठवण्याची शक्‍यता कमी होईल, त्यासाठी पाइप लाइनची व्यवस्था होणे गरजेचे आहे असे सुचवले. यावरून प्रत्येक ठिकाणी सरकार पूर्ण पडणार नाही केंद्राला संपूर्ण देशाची व राज्य सरकारला देखील संपूर्ण राज्याची काळजी घ्यायची आहे, या सोबत सरकारचे उत्पन्नाचे स्रोत देखील कमी झाले आहेत. यामुळे शहरासाठी आपणच आपले आरोग्याची काळजी घेण्यासाठी मदतीचे आवाहन केले असता अनेक डॉक्‍टरांनी, अधिकारी, लोकप्रतिनिधी, सेवानिवृत्त कर्मचारी, ग्रामसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांनी रक्कम गोळा केली. 

आजपासून होणार काम सुरू 
पाइपलाइनच्या काम उद्यापासून (ता. 20) सुरू होणार आहे. एका आठवड्यात जास्तीत जास्त रुग्णांना ऑक्‍सिजन पुरवठा करता येणार आहे. अजून रुग्णालय सुसज्ज करता येईल तरी दानशूरांनी मदत करावी असे आवाहन एस. बी. पाटील यासह सारे कोरोनामुक्त चोपडा अभियानातील कार्यकर्ते करीत आहेत. यासाठी मयूर शिंदे, रमाकांत सोनवणे, सी. एस. पाटील, विपिन बोरोले, कुलदीप पाटील, हरिकेश पाटील हे मेहनत घेत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com