चक्क..आई वडीलांचेच स्मृती मंदिर बनवले शेतात!

कुसुम्बे ते वढोदा रस्त्यालगतच्या शेतात सुंदर असे "आई वडिलांचे स्मृती मंदिर" बांधले
Memorial Temple
Memorial Temple
Summary

आधुनिक जगातला श्रावणबाळ असल्याचा प्रत्यय आणि अनुभव खानदेशवाशीयांना आला

.

गणपूर(ता चोपडा): कलियुगात काय ऐकायला मिळेल ,हे सांगणे तसे कठीण, गावोगावी मंदिरेही आपण खूप पाहतो पण नव्वदी पार करून या जगाचा निरोप घेऊन गेलेल्या आई वडिलांचे (Mother and father) स्मृती मंदिर (Memorial Temple) बांधून तीन हजार लोकांना भोजन देणारा आधुनिक जगातला श्रावणबाळ असल्याचा प्रत्यय आणि अनुभव खानदेशवाशीयांना गुरूवारी आला.

Memorial Temple
Memorial Temple

वृद्धाश्रमात श्रीमंतांसह अनेकांचे आई वडील राहत असल्याचे अनुभव काही नवीन नाहीत.पण जिवंतपणी सेवा केलीच परंतु मृत्यू पच्छातही आई वडिलांच्या पायाजवळ बसता यावे म्हणून कुसुम्बे (ता चोपडा) येथील 45 वर्षीय राजेश्वर उर्फ बाळू रतन पटेल यांनी आपल्या कुसुम्बे ते वढोदा रस्त्यालगतच्या शेतात सुंदर असे "आई वडिलांचे स्मृती मंदिर" बांधले असून त्यांच्या पायाजवळ बसता यावे म्हणून पादुका ठेऊन त्याखाली बसण्याची सोय केली आहे.

Memorial Temple
Memorial Temple

त्यांचे दत्तक वडील रतन पंडित पटेल यांचे 94 वर्षे वयात 11 महिन्यांपूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले ,आणि 80 वर्षीय आई शकुंतला रतन पटेल अवघ्या सात दिवसाचे अंतराने वारली. शेतकरी कुटुंबातील असलेल्या राजेश्वर पटेल यांचे हे कार्य पाहून तरी आई वडिलांना वागवण्याची आधुनिक काळातील मुलांची मनोधारणा व्हावी हा दृष्टिकोन असल्याची भावना त्यांनी 'सकाळ'शी बोलतांना व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com