खेळता खेळता तोल गेला..आणि भाऊ, बहिणीचा बुडून मृत्यू झाला 

खेळता खेळता तोल गेला..आणि भाऊ, बहिणीचा बुडून मृत्यू झाला 
Updated on

चोपडा : चोपडा-गोरगावलेदरम्यान रस्त्याच्या कडेला बांधकाम ठेकेदाराने केलेल्या खोल खड्ड्यात पडून लोकेश रवींद्र बारेला (वय ९) व रोशनी रवींद्र बारेला (६) या दोन आदिवासी भाऊ, बहीण असलेल्या चिमुकल्यांचा बळी गेला. ही घटना गुरुवारी (ता. १८) दुपारी दोन ते चारच्या दरम्यान घडली. 


चोपडा-गोरगावले रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या गंगाईनगर कॉलनीचे सांडपाणी रस्त्यावर येत असल्यामुळे ठेकेदाराने हे सांडपाणी मुख्य रस्त्याच्या कडेला सात ते आठ फूट खोल खड्डे खोदून त्यात उतरविले होते. गंगाईनगरमध्ये एक आदिवासी कुटुंब झोपडी करून रहिवास करीत असताना गुरुवारी (ता. १८) दुपारी या आदिवासी कुटुंबातील दोन चिमुकले श्रुष्टी पिठाच्या गिरणीसमोरील खड्ड्यात खेळत असताना तोल जाऊन खड्ड्यात पडले. यात लोकेश बारेला व रोशनी बारेला या दोन्ही भावंडांचा रस्त्याच्या कामामुळे रस्त्यालगत केलेल्या खड्ड्यात बुडून करुण अंत झाला. रस्त्याच्या ठेकेदाराच्या बेदरकारीमुळे निरपराध्यांचा बळी गेल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ऐन दोन आठवड्यांवर आदिवासींचा भोंगऱ्या सण येत असताना अशी घटना घडली आहे. घटनास्थळी नगरसेवक गजेंद्र जैस्वाल यांनी भेट दिली. 

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा 
ही घटना ठेकेदाराच्या निष्काळजीमुळे झाली असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय दोन्ही मुलांचे मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे रवींद्र बारेला यांनी सांगितले.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon Crime News
Ahilyadevi Holkar Loan Waiver 2026
Bhusawal green hydrogen project
Why were Jalgaon land officials arrested?
Marathi News Esakal
www.esakal.com