चोपडाः बालाजी रथोत्सवची मिरवणूक रद्द, जागेवरच पूजा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चोपड्यात यंदाही देखील बालाजी रथोत्सवची मिरवणूक रद्द करण्यात आली होती
Balaji Rathotsav
Balaji Rathotsav
Updated on

चोपडा : सुमारे दीडशे वर्षाची परंपरा (Tradition) असलेल्या चोपडा येथील बालाजी संस्थानच्या (Balaji Trust) वतीने आज बालाजी रथोत्सवाचे (Balaji Rathotsav) जागेवर पूजन करण्यात आले असून बालाजी मंदिर ते रथ दरम्यान हा कार्यक्रम पार पडला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चोपड्यात यंदाही देखील बालाजी रथोत्सवची मिरवणूक रद्द करण्यात आली होती. त्यामुळे बालाजी मंदिर संस्थान विश्वस्तांच्या पुढाकाराने आज बालाजी रथाचे जागेवर पूजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस अधीक्षक व राजकीय नेत्यांची उपस्थिती होती.

Balaji Rathotsav
...तर आम्हाला चित्रपटात भूमिका द्या - गिरीश महाजन


त्यात प्रामुख्याने विधानसभा माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, भाजप चे माजी केंद्रीय समिती सदस्य घनश्याम अग्रवाल,चोपडा पीपल्स बँकेचे चे चेअरमन चंद्रहास गुजराथी, ऍड एस डी काबरा,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय पाटील,उद्योजक आशिष गुजराथी,सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले,पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती मध्ये हा कार्यक्रम पार पडला.


बालाजी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष प्रवीण गुजराथी,उपनगराध्यक्ष भुपेंद्र गुजराथी, प्रफुल्ल गुजराथी, दीपक पाटील,आचल अग्रवाल,संजय सोमानी,नितीन गुजराथी, मनीष पारीख, किरण गुजराथी,सुनील गुजराथी, लाला गुजराथी,प्रवीण गोपलदास गुजराथी, शांताराम लोहार,सोमनाथ वारुळे,कैलास सैदाने,विपीन गुजराथी,यांनी हा कार्यक्रम रथ गल्ली मध्ये जागेवर रथाचे पूजन करून घेतले.

Balaji Rathotsav
शिरपूर: प्रेमीयुगलाने पुलावरून नदीत घेतली उडी..युवकाचा मृत्यू


यावेळी मोगरी व रथाचे विधिवत पूजन पाटीलगढी येथील प्रतीक पाटील,मल्हारपुरा येथील जितेद्र वाघ,याच्या हस्ते पूजन करण्यात आले होते.तहसीलदार अनिल गावीत याच्या वतीने कोतवाल जितेंद्र धनगर यांनी देखील यावेळी बालाजी मंदिरात हजेरी लावली होती. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार बालाजी संस्थान च्या वतीने प्रवीण गुजराथी यानी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon electricity supply controversy involving farmers
Smart Meter Bill
Girish Mahajan political retirement news
Fatal Car Accident on Washim Malegaon Road Parked Truck Collision Claims Life of Young Man From Shirpur Jain
Marathi News Esakal
www.esakal.com