धरणगावला कोरोनाची वाढती संख्या चिंताजनक..रुग्ण संख्या ११८ 

धरणगावला कोरोनाची वाढती संख्या चिंताजनक..रुग्ण संख्या ११८ 
Updated on

धरणगाव :  धरणगाव शहरासह तालुक्यात कोरोना झपाट्याने पसरतो आहे. महिना भरापूर्वी पहिला रुग्ण आढळला होता. आजपर्यंत रुग्ण संख्या ११८ झालेली आहे. अलीकडे प्रत्येक दिवसाला रुग्ण वाढत आहेत. यामुळे प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढलेली आहे. मात्र, पॉझिटिव्ह अहवाल हे सुमारे आधीच पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील आणि संपर्कातील व्यक्तींचे आहेत. 

एकदमच नवीन रुग्ण आढळला असे दिसत नाही, ही नागरिकांना दिलासा देणारी बाब आहे. अद्याप २१ जणांचे अहवाल येणे बाकी आहे. नागरिकांनी सावधान राहावे, दक्षता पाळावी असे आवाहन प्रशासन करीत आहे. धरणगाव शहरासह तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढताहेत. सोमवारी (ता. २२) नवे सात रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने ग्रामीण भागात ३१ तर शहरी भागात ८७ असे एकूण ११८ रुग्ण संख्या झाली असल्याची माहिती तहसीलदार नितीनकुमार देवरे, नायब तहसीलदार प्रथमेश मोहळ यांनी दिली आहे. शहरात रुग्ण संख्या वाढल्याने शहरवासीयांसह प्रशासनाची चिंता वाढली आहे. अलीकडे अधिक व्यापक उपाययोजना करण्याची आणि कठोर कारवाई करण्याची गरज आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करावी. कोरोना विरोधात लढण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती करणे गरजेचे आहे. 

शहरात दोन वेळा पाच- पाच दिवसाचा बंद केल्याने साखळी तोडण्यात काही अंशी यश आलेले आहे. त्यामुळे अलीकडे संख्या नियंत्रणात दिसत आहे. शतकाकडे वाटचाल असली तरी हे सर्व रिपोर्ट आधीच स्वॅब घेतलेल्या नागरिकांचे आहेत. आतापर्यंत ६९ रुग्ण बरे झाले आहेत. ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या वास्तव्याचा भाग प्रशासनाने सील केलेला आहे. रुग्णांमध्ये शहरातील हेमिंदू नगर मधील पाच, परिहार नगर मधील एक व पाळधी येथील एक असे सात रुग्ण असून, एकूण ११८ रुग्ण संख्या आहे. कोरोनाचे वाढत्या प्रार्दुभावामुळे नागरिकांनी स्वतः सक्षमपणे काळजी घेतली पाहिजे. प्रशासनाचे नियम पाळावेत. मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्स पाळा, विनाकारण बाहेर फिरू नये, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे, अंत्ययात्रा, सार्वजनिक कार्यक्रम सध्या टाळले पाहिजेत. प्रशासनाला सहकार्य केले, तर आपण निश्चित यशस्वी होऊ. बाजारात, कोणत्याही दुकानावर गर्दी करू नका, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने तहसीलदार नितीनकुमार देवरे, नायब तहसीलदार प्रथमेश मोहळ, मुख्याधिकारी जनार्दन पवार, सहायक पोलिस निरीक्षक पवन देसले यांनी केले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Jalgaon flyover collapse contractor FIR
Jalgaon bypass one way traffic
Marathi News Esakal
www.esakal.com