esakal | गावे  ८९ अन् केवळ पाच कृषी साहाय्यक 
sakal

बोलून बातमी शोधा

गावे  ८९ अन् केवळ पाच कृषी साहाय्यक 

धरणगाव तालुक्यातील स्वतंत्र कृषी कार्यालय निर्माण झाल्यानंतर विनय बोरसे व विद्यमान कृषी अधिकारी अभिनव माळी हे दोनच अधिकारी कायम नियुक्तीवर आहेत.

गावे  ८९ अन् केवळ पाच कृषी साहाय्यक 

sakal_logo
By
दगडू पाटील

धरणगाव  : तालुक्यात कृषी विभागाची कमी मनुष्यबळामुळे वाताहत असून, अपूर्ण कर्मचारी शेतकऱ्यांना पुरेशी सुविधा देऊ शकत नाही. तालुका निर्मितीनंतर साधारण २००५ मध्ये तालुका कृषी कार्यालय स्थापन झाले. मात्र, स्थापनेपासून आजतागायत या कार्यालयात शासनाने मंजूर केलेल्या पदाप्रमाणे पुरेसे कर्मचारी उपलब्ध झालेले नाहीत. 
तालुक्यातील ८९ गावांचा ४२ हजार हेक्टर जमिनीसाठी केवळ पाच कृषी सहायक कार्यरत आहेत. 

एरंडोल तालुक्याचे विभाजन होऊन धरणगाव स्वतंत्र तालुक्याची निर्मिती करण्यात आली. यावेळी ८९ गावांचा समावेश धरणगाव तालुक्यात तर उर्वरित साधारण ६२ गावे एरंडोल तालुक्यात आलेली आहेत. तालुक्यात कृषी कार्यालयात कृषी सहायक यांचे १२ पदे मंजूर आहेत. मात्र, कार्यरत पदे केवळ पाच आहेत, ८९ गावांतील ४२ हजार हेक्टर जमिनीसाठी पाच कृषी साह्यायक आहेत. म्हणजे साधारण १८ गावांची आणि ८ हजार ४०० हेक्टर जमिनीची जबाबदारी एक कृषी सह्यायक सांभाळत आहे. शासनाच्या मापदंडानुसार पंधराशे हेक्टर जमिनीसाठी एक कृषी साहाय्यक असतो. ही मोठी तफावत आहे. कृषी सहाय्यक नेमून दिलेल्या गावांना कृषी विस्तार, मार्गदर्शन, सल्ला देतात, पीक परिस्थितीची पाहणी करणे, शेतीशाळा, पंचनामे, मृद्संधरण, फलोत्पादन योजना, कृषी सांख्यिकी आदी अनेक कामे करीत असतात.

त्यामुळे कृषी सहायक खेड्यावर असताना तर तालुका कृषी अधिकारी एकटेच कार्यालय सांभाळत असतात. या कार्यालयात स्थापनेपासून कधीही मंजूर पदाएवढे १२ कर्मचारी नियुक्त झाले नसल्याचे समजते. धरणगाव तालुक्यातील स्वतंत्र कृषी कार्यालय निर्माण झाल्यानंतर विनय बोरसे व विद्यमान कृषी अधिकारी अभिनव माळी हे दोनच अधिकारी कायम नियुक्तीवर आहेत. अन्यथा प्रभारी अधिकारीवरच कृषी विभागाचा भार चालत आलेला आहे. 

एकच मंडळ 
पूर्वीच्या एरंडोल तालुक्यात तीन मंडळ होते. यापैकी धरणगावसाठी केवळ एकच मंडळ देण्यात आले असून, एका मंडळाची आवश्यकता या कार्यालयाला आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यकाळात एक मंडळ वाढविण्याचा प्रस्ताव कार्यालयामार्फत पाठविण्यात आला आहे. मात्र, अद्याप हा प्रस्ताव मंजूर झालेला नाही. 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top