मातृ छत्र हरपल्याने होता कठीण मार्ग; तरीही ती ठरली समाजातील पहिली पदवीधर

first graduate girl
first graduate girl

धरणगाव (जळगाव) : घरात अठरा विश्व दारिद्र्य, वयाच्या दहाव्या वर्षी मातृ छत्र हरपले. वडिलांनी दुर्लक्षित केले. मात्र जिद्द, मेहनत आणि मामाची साथ या बळावर दिपाली निकाळजे या मातंग समाजाच्या विद्यार्थिनीने तालुक्यात मातंग समाजात पहिली विज्ञान पदवीधर होण्याचा मान मिळविला. दिपालीला बी. एससीमध्ये 77.11 गुण मिळविले. मातृ छत्र हरपलेल्या दिपालीचे उज्ज्वल भविष्याकडे प्रेरणादायी वाटचाल सुरू आहे
अमोना (जि. बुलढाणा) येथील रहिवासी असलेल्या दिपाली निकाळजे या विद्यार्थिनीची घरची परिस्थित अत्यंत नाजूक होती. अशात वयाच्या दहाव्या वर्षी मातृ छत्र हरपले. आई गेल्याने वडिलांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले. अशा परिस्थितीत चिमुकलीला डोळ्यासमोर अंधार दिसत होता. मात्र मामाची मोलाची साथ मिळाली. आईची कमतरता जाणवू दिली नाही. यामुळेच तिने गवसणी घातली आणि विज्ञान शाखेतून पदवीधर होण्याचा मान मिळविला.

मामा झाला आई
दीपालीचे मामा संजय तोडे (धरणगाव) कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी. ते दिपालीच्या आईची भूमिका निभावत आहेत. बहिणीच्या मृत्युनंतर दिपालीसह भावंडांची जबाबदारी संजय तोडे यांनी स्वीकारली. या भावंडाना आईची आठवण कधीही येऊ दिली नाही. दिपालीला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले आणि आज विज्ञान शाखेच्या पदवीधर बनविले. एवढेच नव्हे तर ही विद्यार्थिनी धरणगाव तालुक्यात मातंग समाजातील पहिली पदवीधर विद्यार्थिनी ठरली आहे. संपूर्ण तोडे परिवाराला दिपालीचे यशाचा अभिमान आहे. 

अन्‌ तिचा होवू लागला गौरव
भविष्यात पदव्युत्तर शिक्षण घेऊन समाजाची, राष्ट्राची सेवा करायची ज्या समाजात आपण जन्माला आलो; या समाजासाठी खास करून मातंग समाजातील मुलींसाठी कार्य करण्याचा दिपालीचा मानस आहे. तिच्या यशाचे श्रेय दिपाली मामा संजय तोडे, मामी सुनीता तोडे, आजोबा भिमराव तोडे, आजी यांना दिले. तिच्या यशाबद्दल मातंग समाज आणि वाल्मिकी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. मातंग समाजाच्या वतीने प्रल्हाद जाधव, सुनील चित्ते, समाधान चित्ते,सतीश जाधव यांनी गौरव केला. वाल्मिकी समाजाच्यावतीने विनोद पचरवाल, पापा वाघरे, सुरज वाघरे, मनिष पचरवाल, मेघा पचरवाल यांनी गौरव केला. तर संस्थेच्यावतीने अध्यक्ष डॉ. अरुण कुलकर्णी, उपाध्यक्ष वसंतराव गाळापूरे, सचिव डॉ. मिलिंद डहाळे, संचालक अजय पागारिया, प्राचार्य डॉ. टी. एस. बिराजदार, उपप्राचार्य डॉ. किशोर पाटील, धरणगाव तालुका टीडीएफचे अध्यक्ष डी. एस. पाटील यांच्यासह प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वर्गानी अभिनंदन केले.

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com