धुळे : वीजपुरवठा खंडित; शेतकरी भडकले

वीज कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना वठणीवर आणावे यासाठी शंभराहून अधिक शेतकरी ट्रॅक्टरने जिल्हाधिकारी कार्यालयात आले.
धुळे : वीजपुरवठा खंडित; शेतकरी भडकले




धुळे : वीज महावितरण (MSEDCL) कंपनीच्या सोनगीर शाखेने कुठलीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित केल्याने देवभाने (ता. धुळे) येथील भाजीपाला व पिके करपली. या प्रकारामुळे भडकलेले शंभराहून अधिक शेतकरी (Farmers) थेट ट्रॅक्टरने जिल्हाधिकारी कार्यालयात (Movement) दाखल झाले. करपलेल्या पिकांसह त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्याकडे पोटतिडकीने कैफियत मांडून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

धुळे : वीजपुरवठा खंडित; शेतकरी भडकले
अवैध वाळूचोरी नियंत्रणासाठी महसूलसह पोलिसांची पथके

अचानक चारही रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित केल्याने आणि मनमानी कारभारामुळे फळफळावळ, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या प्रकरणी न्याय मिळावा आणि वीज कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना वठणीवर आणावे यासाठी शंभराहून अधिक शेतकरी ट्रॅक्टरने जिल्हाधिकारी कार्यालयात आले. वीज कंपनीविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत आणि दोषींवर कारवाईची मागणी करत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड यांना निवेदन दिले.


देवभाने शिवारातील चार रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे दीडशेहून अधिक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. यात कोथिंबीर, पालक, मुळा, मेथी, कांदा, बियाणे, वांगी, भेंडी, टोमॅटो, मिरची, कारले, गिलके, फ्लॉवर आदींसह सर्व पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले. वीजपुरवठा खंडित केल्यामुळे सर्व प्रकारची पिके करपली. यापूर्वी वेळोवेळी वीज वितरण कंपनीच्या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी वीजबिल भरले. मात्र, सद्यःस्थितीत शेतकरी वर्ग खरीप हंगामापासून अडचणीत आहे. पावसाळ्याच्या सुरवातीला अत्यल्प पर्जन्यमान, नंतर काही पिकांचे उत्पादन हाती येणार होते. त्या वेळी अतिवृष्टीचा फटका बसला आणि हंगाम वाया गेला. तरीही शेतकरी वर्गाने नव्या जोमाने रब्बी हंगामावर आशा ठेवत विविध पिके व विविध बियांची लागवड केली. पिके बहरू लागताच वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी देवभाने शिवारात रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित केला.

धुळे : वीजपुरवठा खंडित; शेतकरी भडकले
खडसे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार..बिनविरोधसाठी पळपुटेपणा- गिरीश महाजन


यापूर्वी साडेतीन महिन्यांत सात वेळा विद्युत रोहित्र जळून खराब झाले. त्या वेळी सर्व शेतकऱ्यांनी पैसे जमा करून रोहित्र बसविले. याच काळात २३ हजार किमतीची वायर जळून खाक झाली. तो खर्चही शेतकऱ्यांनी केला. असे असताना वीज कंपनीच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. यात वीजपुरवठा सुरळीत करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी भागवत माळी, विजय माळी, अभिमन्यू माळी, जगदीश माळी, दिनेश माळी, आत्माराम माळी, डोंगर माळी, आनंदा माळी, संतोष माळी, विश्‍वनाथ चौधरी, सुरेश माळी, भावराव माळी, नानाभाऊ माळी, सोमाजी माळी, बाबूलाल माळी, शंकर माळी यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com