esakal | जळगाव, चाळीसगाव वगळता जिल्ह्यात नवे कोरोना बाधित शून्य
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Fight

जळगाव, चाळीसगाव वगळता जिल्ह्यात नवे कोरोना बाधित शून्य

sakal_logo
By
टीम ई सकाळ


जळगाव : कोरोनाच्या (Corona) उतरत्या आलेखाची मालिका सुरूच आहे. बुधवारी जळगाव शहर व चाळीसगाव तालुका वगळता जिल्ह्यातील अन्य कुठेही कोरोनाचा एकही नवा रुग्ण (Corona ptient) आढळून आला नाही. दिवसभरात केवळ सहा रुग्ण समोर आले, तर ११ रुग्णांना बरे झाल्याने डिस्चार्ज मिळाला.

( district only jalgaon and chalisgaon new corona patient)


जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आल्याचे चित्र आहे. पहिली लाट ओसरल्यानंतर संसर्गाची स्थिती एवढी सुधारली नव्हती, ती दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाल्यानंतर सुधारली आहे. बुधवारी प्राप्त तीन हजार २३९ चाचण्यांच्या अहवालात जळगाव शहरात दोन व चाळीसगाव तालुक्यात चार असे केवळ सहा रुग्ण आढळले, तर दिवसभरात ११ रुग्ण बरे झाले. एकूण रुग्णसंख्या एक लाख ४२ हजार ५४० झाली असून, बरे होणाऱ्यांचा आकडा एक लाख ३९ हजार ८५६ वर पोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या आणखी कमी होऊन ती आता १०९ पर्यंत मर्यादित राहिली आहे.

एरंडोल, बोदवडमध्ये रुग्ण नाही
सद्य:स्थितीत चाळीसगावात सर्वाधिक ४१, पाठोपाठ जळगाव शहर २५ व भुसावळ १४ सक्रिय रुग्ण असून, अन्य सर्व तालुक्यांमध्ये सक्रिय रुग्णसंख्या केवळ एकअंकी आहे. एरंडोल व बोदवड तालुक्यात एकही रुग्ण नाही.

loading image