शेतकऱ्यांना त्रास दिला तर शिवसेनेशी गाठ- आमदार चिमणराव पाटील

अल्हाद जोशी
Thursday, 19 November 2020

अनेक वर्षांपासून शेतकरी विविध संकटांशी सामना करीत आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

एरंडोल : सततची नापिकी, अतिवृष्टी, बदलते हवामान यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना त्रास दिला तर गाठ शिवसेनेशी आहे, असा इशारा आमदार चिमणराव पाटील यांनी दिला.

आवश्य वाचा- प्रेमीयुगल चौपाटीवर आले फिरायला; पण त्‍यांच्यावर बेतला वाईट प्रसंग

एरंडोल येथील म्हसावद रस्त्यावरील श्रीकृपा जिनर्स प्रा. लि. येथे सुरू करण्यात आलेल्या शासकीय कापूस खरेदी केंद्राच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. आमदार पाटील यांच्याहस्ते काटापूजन करून खरेदी केंद्राचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमास नगराध्यक्ष रमेश परदेशी, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, पंचायत समितीचे उपसभापती अनिल महाजन, शिवसेनेचे तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, तालुका उपप्रमुख रवींद्र चौधरी, शहरप्रमुख कुणाल महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील, युवासेनेचे शहरप्रमुख अतुल महाजन, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, राजेंद्र चौधरी आदी पदाधिकारी व शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते. 

 

तर शिवसेना स्टाईलने उत्तर

या वेळी आमदार पाटील यांनी शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कोणत्याही प्रकारची वशिलेबाजी न करता शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन केले. शेतकऱ्यांना त्रास दिल्यास शिवसेना पदाधिकारी कायदा हातात घेतील आणि शिवसेना स्टाइलने उत्तर देतील, असा इशारा दिला. 

लुट होणार नाही याची दक्षता घ्या 

अनेक वर्षांपासून शेतकरी विविध संकटांशी सामना करीत आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शासकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले. श्रीकृपा जिनर्सचे संचालक संजय काबरा यांनी सर्वांचे स्वागत केले. शेतकऱ्यांनी शासकीय कापूस खरेदी केंद्रावर माल विक्रीसाठी आणावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

संपादन- भूषण श्रीखंडे

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news erando MLA chimanrao patil warns that shiv sena will look into cheating farmers in cotton procurement