लिंबाच्या शेतात सुरू होता पत्यांचा डाव, पोलिसांची धाड पडताच अंधारात सुरू झाली पळापळ 

अल्हाद जोशी
Thursday, 26 November 2020

विशेष पोलीस पथकातील कर्मचा-यांनी हॉटेल पंजाबचे मागे असलेल्या वंजारी वाट रस्त्याच्या बाजूला असलेल्या बापू चौधरी यांच्या लिंबूच्या शेतात सुरु असलेल्या पत्त्यांच्या क्लबवर छापा टाकला.

एरंडोल ः पोलीस महानिरीक्षक यांनी अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष पोलीस पथकाने एरंडोल येथे रात्री दहा वाजेच्या सुमारास पत्त्यांच्या क्लबवर धाड टाकली. अचानक झालेल्या कारवाईमूळे पळापळ झाली. काहींनी अंधाराचा फायदा घेत पोलिसांच्या हातून निसटण्यास यशस्वी झाले. तर सामान्य नागरिकांकडून पोलिसांनी केलेल्या कारवाईचे स्वागत केले आहे.   

आवश्य वाचा- कोरोनामुळे श्रीराम रथोत्सवाला यंदा दोन लेअरची सुरक्षा -

याबाबत माहिती आशिक, की राष्ट्रीय महामर्गावर हॉटेल शेरे पंजाबच्या मागे पत्त्यांचा क्लब सुरु असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक यांनी स्थापन केलेल्या विशेष पोलीस पथकास समजली.विशेष पोलीस पथकातील कर्मचा-यांनी हॉटेल पंजाबचे मागे असलेल्या वंजारी वाट रस्त्याच्या बाजूला असलेल्या बापू चौधरी यांच्या लिंबूच्या शेतात सुरु असलेल्या पत्त्यांच्या क्लबवर छापा टाकला.

यांना केली अटक

पोलिसांनी टाकलेल्या धाडीत स्वप्नील मुरलीधर पाटील रा.बोरगांव (ता.धरणगाव),मच्छिंद्र नारायण महाजन रा.विखरण,सुनिल नाना पाटील,रा.खडके,रफिकखान याकुबखान रा.जहांगीरपुरा,एरंडोल,पंढरी खुशाल पाटील रा.खडके खुर्द,शांताराम राजाराम महाजन रा.एरंडोल,अमित परदेशी,रा.एरंडोल,गुलाब महादू पाटील,रा.खडके खुर्द,सिद्धार्थ परदेशी,एरंडोल,राजेश मोतीराम पाटील रा.रोटवद (ता.धरणगाव) यांचेसह अनेक जन पत्ते खेळताना आढळून आले.पथकाने धाड टाकताच अनेक जन मोटर सायकली सोडून अंधाराचा फायदा घेवून फरार झाले.

रोकड, मोटर सायकल, मोबाईल जप्त

पोलिसांनी टाकलेल्या धाडीच 1 लाख 5 हजार 260 रुपयांची रोकड,दहा मोटर सायकली व जुगार खेळण्याचे साहित्य जप्त केले.याबाबत हवालदार उमाकांत खापरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सर्व संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.दरम्यान शहरात गांधीपुरा भागातील अनजानी नदीच्या पात्रालगत तसेच म्हसावद नाका परीसर,आठवडे बाजार परिसरात मोबाईलवर सट्टा सुरु असून त्यात दररोज हजारो रुपयांची उलाढाल होत आहे.मोबाईलवर सट्टा घेणा-या चालकांविरुद्ध देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news erando special squad of the Inspector General of Police raided Erandol's address club