esakal | जळगावहून लवकरच पुणे, इंदूरसाठी विमानसेवा
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon pune flights

जळगावहून लवकरच पुणे, इंदूरसाठी विमानसेवा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : अहमदाबाद- जळगाव- मुंबई अशी विमानसेवा (Jalgaon airport flights service) सुरु झाल्यानंतर आता जळगावहून पुणे, इंदूरसाठी प्रवासी सेवा सुरु करण्यासंदर्भात प्रस्ताव असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. विविध मालाचे हब असलेल्या जळगाव जिल्ह्यातून मालवाहतुकीसाठीही पाठपुरावा सुरु असल्याची माहिती खासदार उन्मेश पाटील (MP Unmesh patil) यांनी दिली. (jalgaon-airport-Flights-from-to-Pune-Indore-soon)

जळगाव विमानतळावर सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सेवा- सुविधांच्या संदर्भात त्यांनी आढावा घेतला. या वेळी सल्लागार समितीचे सदस्य भरत अमळकर, सतीश देशमुख, डॉ. मंगेश वाडेकर (चाळीसगाव), विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी सुनील मोंगीरवार आदी उपस्थित होते.

हेही वाचा: शेतकऱ्याच्‍या समस्‍या सोडविण्यात सरकार अपयशी : गिरीश महाजन

विमानसेवा सुरळीत

उन्मेश पाटील यांनी सांगितले की, गेल्या १८-२० महिन्यांत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर जळगाव विमानतळावर नाईट लॅन्डींगसारख्या अद्ययावत स्वरुपाच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. मुंबईत पार्किंग स्लॉटही उपलब्ध होत असल्याने त्यासाठी प्रतीक्षा करावी लागत नाही, अथवा विमानाची फेरीही परत जात नाही. त्यामुळे नियोजित वेळापत्रकानुसार विमानसेवा बहुतांशी सुरळीत झाली आहे.

रिजनल कनेक्टीव्हिटी सर्व्हिस

या सेवेंतर्गत पुणे, इंदूरसाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. पुण्याचे विमानतळ संरक्षण खात्याच्या अखत्यारित असल्याने या ठिकाणी पार्किंग स्लॉटचा प्रश्‍न सुटल्यानंतर ही सेवा सुरु होऊ शकेल. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत त्यासाठी स्थानिक उद्योजक, व्यावसायिकांच्या बैठकी झाल्या असून लवकरच हा विषय मार्गी लागेल.

loading image
go to top