कोरोना योध्दांना अशीही आदरांजली; दळवींचा सायकलीने ४ हजार ‘किमी’चा प्रवास 

देविदास वाणी
Friday, 25 September 2020

कोरोना योद्ध्यांना एक आदरांजली म्हणून अजित दळवी यांनी महाराष्ट्र प्रदक्षिणेला सुरुवात केली आहे.

जळगाव ः शहीद जवान तसेच कोरोनाच्या काळात आपले कर्तव्य बजावताना कोरोनाचे बळी ठरलेले डॉक्टर्स व नर्सेस या कोरोना योद्ध्यांना एक आदरांजली म्हणून अजित दळवी यांनी महाराष्ट्र प्रदक्षिणेला सुरुवात केली आहे. मुंबईवरून त्यांचा प्रवास सुरू झाला आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्हे ते या प्रवासात पूर्ण करणार आहेत. ८ जिल्हे पार करुन ते गुरूवारी सायंकाळी जळगाव येथे दाखल झाले होते. 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जळगाव सायकलीस्ट ग्रुपचे अमोल देशमुख यांच्याशी झाली. श्री. देशमुख यांनी जळगाव सायकलीस्ट गृपमध्ये याबाबत माहिती दिली असता जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी जळगाव सायकलीस्ट गृपच्या सर्व मेंबर्सना आवाहन केले की, आकाशवाणी चौकात जमून अजित दळवीं सोबत औरंगाबाद रोडवर जळगाव विमानतळापर्यंत सायकलिंग करीत जाऊ व अजित दळवींना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देऊ. शुक्रवारी सकाळी आकाशवाणी चौक येथून प्रतापराव पाटील, अमोल देशमुख, आशिष पाटील, अभिषेक सिंग, अजय पाटील, रुपेश महाजन, इत्यादी १० ते १२ सायकलीस्टने जळगाव विमानतळापर्यंत व त्यानंतर प्रतापराव पाटील इतर ६ सायकलीस्ट सोबत सुप्रीम कंपनी, गाडेगांवपर्यंत अजित दळवी सोबत सायकलींग करीत गेले व त्यांनी अजित दळवीला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्यात. 

जळगावहून औरंगाबाद, जालना, बुलढाणा सायकलींग करीत अजित दळवी आज मुर्तीजापुर येथे मुक्कामी पोहचले आहेत. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Ajit Dalvi's cycling journey across Maharashtra in honor of Corona Warrior