आता गावांमधील सर्व घरांना घरगुती नळजोडणी मिळणार  

आता गावांमधील सर्व घरांना घरगुती नळजोडणी मिळणार  
Updated on


जळगाव ः केंद्र शासनाचा 15 व्या वित्त आयोगाचा ग्रामपंचायतीं दिला जाणारा निधी हा पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी वापरण्याच्या सूचना मिळाल्या आहे. त्यानुसार हा निधी ग्रामीण पाणीपुरवठा योजना कार्यक्रमांसाठी वापरण्याचा निर्णय पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने घेतला असून निधीचा वापर करून गावांमधील सर्व घरांना घरगुती नळजोडणीचे कनेक्शन दिले जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

'15 व्या वित्त आयोगातंर्गत ग्रामपंचायतींना मिळणारा निधी 50 टक्के बंधीत स्वरुपात ठेवला आहे. पिण्याच्या पाण्याच्या व स्वच्छतेच्या योजनांसाठी हा निधी वापरला जातो. त्यानुसार हा निधीचा वापर ग्रामपंचायतीने वापरून घरगुती नळजोडणी देण्यासाठीच वापरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील अनेक गावांना याचा लाभ होणार असून ज्या गावांमध्ये पाण्याची समस्या आहे तेथे घरगुती नळ जोडणीची कामे पूर्ण होणार आहे असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

असे होणार योजनेचे काम 
जी गावे जल जीवन मिशन अंतर्गत निवडली आहे तेथे ग्रामपंचात पातळीवर ग्रामविकास अभियानाचा वित्त आयोगाचा निधीतून घरगुती नळ जोडणीचे कामे पूर्ण करावी. कामांना तांत्रिक मान्यता उपअभियंता, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद हे सक्षम देतील. तसेच यापूर्वी ज्या गावांमध्ये पाण्याच्या स्रोत विकास, नवीन स्रोतांचा शोध, ऊर्ध्व वाहिन्या, जलकुंभ बांधणी ही कामे निश्चित करून घरगुती नळ जोडण्याची कामे करावयाची आहेत. 

पंधरा लाख रुपयांपर्यंत मिळणार मान्यता
योजनेचा लाभ घेणाऱया आशा गावांनी 15 व्या वित्त आयोगातून प्रथम 100 टक्के घरांना नळजोडणीची कामे पूर्ण करावी लागेल त्यानंतर इतर आवश्यक कामाचे स्वतंत्र अंदाजपत्रक ग्रामपंचतींना तयार करावे लागेल. अशा कामांना पंधरा लाख रुपये पर्यंतच्या कामांना प्रशासकीय मान्यता ग्रामपंचायत देवू शकते. परंतू या कामांच्या प्रस्तावांना तांत्रिक मान्यता कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषदकडून घ्यावी लागणार आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ahilyadevi Holkar Loan Waiver 2026
Bhusawal green hydrogen project
Why were Jalgaon land officials arrested?
Jalgaon electricity supply controversy involving farmers
Marathi News Esakal
www.esakal.com