पोलिसांच्या गस्तीमूळे चोरट्यांचा प्रयत्न फसला; एटीएम मधील २३ लाख रुपये सुरक्षीत

शंकर भामरे
Wednesday, 2 December 2020

एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन जणांना पैकी दोन जणांचे चेहरे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पुढील हालचाली मात्र कॅमेऱ्यावर लाल रंगाचा स्प्रे मारल्याने स्पष्टपणे चित्रित झालेल्या नाहीत.

पहुर ः बँकेने एटीएम मध्ये २३ लाख रुपयांचा भरणा केला होता .यातील ग्राहकांनी काही रक्कम काढली होती. रात्री पावणे तीनच्या सुमारास एटीएम फोडत असतानाच गस्तीवरील पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे चोरट्यांचा प्रयत्न फसला आणि बँकेची २३ लाख रुपयांची रक्कम सुरक्षित राहिली. यावरून रात्रीच्या गस्तीचे महत्व अधोरेखित होते .दोनच दिवसांपूर्वी बिकानेर  मिठाईवाला दुकानामधूनही अज्ञात चोरट्याने १५ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली होती.

आवश्य वाचा- लग्नासाठी धमकावत विवाहितेवर अत्याचार; गरजेपुरते ‘हम साथ-साथ’ नंतर ‘हम आपके हैं कौन’ -

 
दोन चेहरे कॅमेऱ्यात ' कैद ' 

एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन जणांना पैकी दोन जणांचे चेहरे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पुढील हालचाली मात्र कॅमेऱ्यावर लाल रंगाचा स्प्रे मारल्याने स्पष्टपणे चित्रित झालेल्या नाहीत .आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तपासून चोरट्यांचा छडा लावण्यात येईल ,असे मत उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर काकडे यांनी जीएम न्यूजशी बोलताना व्यक्त केले .

 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची गरज 
पहूर बसस्थानकावर नेहमीच रात्री आणि दिवसाही मोठ्या प्रमाणात वर्दळ असते . कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि  गुन्हेगारांवर 'वॉच 'ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची नितांत गरज आहे .यापूर्वी तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी बस स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते .आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण झाले होते मात्र आज घडीला हे कॅमेरे बंद असल्याने गुन्हेगारीला एक प्रकारे अभयच मिळत आहे.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon attempts by three thieves to blow up an ATM at Pahur failed