बीएचआर’ अफरातफर : सलग नऊ दिवस होणार चौकशी; चौघांना पोलिस कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 November 2020

जळगाव औद्योगिक वसाहत येथील बीएचआरचे मुख्य कार्यालय, विवेक ठाकरे यांचे गोलाणी मार्केटचे कार्यालय, सुनील झवर यांचे कार्यालय आदी ठिकाणी पोलिस पथके दुसऱ्या दिवशीही ठाण मांडून होती.

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) अवसायक जितेंद्र कंडारे, सीए महावीर जैन, धरम किशोर सांखला, सुजित सुभाष बाविस्कर (वाणी), विवेक ठाकरे अशा अटकेतील चौघांनाही शनिवारी (ता. २८) पुणे न्यायालयात हजर केले असता, त्यांना नऊ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, रंजना खंडेराव घोरपडे (निवृत्त माध्यमिक शिक्षिका, रा. वृंदावन सोसायटी, भोसलेनगर, पुणे) यांच्या फिर्यादीवरून तब्बल दहा जणांविरुद्ध २५ नोव्हेंबरला गुन्हा दाखल झाला होता. 
तक्रारीनुसार सुजित सुभाष बाविस्कर ऊर्फ वाणी, धर्म किशोर सांखला, महावीर मानक जैन, विवेक देवीदास ठाकरे, अवसायक जितेंद्र कंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, सुनील झंवर, योगेश सांखला आदींनी मिळून १७ लाख आठ हजार ७४२ रुपयांचा अपहार व फसवणूक केलेली आहे. दरम्यान, या प्रकरणात फिर्यादी व त्यांची बहीण या दोघांनी मिळून गुंतवलेले १६ लाख ९० हजार १४२ रुपये विवेक ठाकरे याने अन्य संशयितांशी संगनमत करून पैसे मिळवून देण्यासाठी १८ हजार ६०० रुपये घेऊन फसवणूक व अपहार केला आहे. दरम्यान, अटकेतील चारही आरोपींना ६ डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त मिलिंद पाटील, पोलिस निरीक्षक सुचिता खोकले तपास करीत आहेत. 
 
दुसऱ्या दिवशीही तपासणी 
जळगाव औद्योगिक वसाहत येथील बीएचआरचे मुख्य कार्यालय, विवेक ठाकरे यांचे गोलाणी मार्केटचे कार्यालय, सुनील झवर यांचे कार्यालय आदी ठिकाणी पोलिस पथके दुसऱ्या दिवशीही ठाण मांडून होती. शनिवारी रात्री पथकांनी पुरावे, दस्तऐवजांचे गाठोडे बांधण्यास सुरवात केली होती. उशिरा रात्री पथके पुण्याला रवाना होणार असल्याचे सांगण्यात आले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon bhr patsanstha fraud case faur parson police castedi