
बीएचआर मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह पतसंस्थेत झालेल्या अपहार, फसवणूक व गैरव्यवहार प्रकरणात शिवराम चौधरी (वय ७५, रा. शिव कॉलनी) यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी (बीएचआर)चा संस्थापक अध्यक्ष प्रमोद ऊर्फ अंकल रायसोनी त्याच्या साथीदारांसह सुमारे पाच वर्षांपासून कारागृहात आहे. बेहिशेबी ठेवींचे संकलन करून त्याचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात शनिवारी (ता. ५) अंकल रायसोनी ॲन्ड गँगवर दोषारोपपत्र ठेवण्यात येणार होते. मात्र, न्यायालयाने कामकाजासाठी मंगळवारची (ता. ८) तारीख दिली आहे.
बीएचआर मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह पतसंस्थेत झालेल्या अपहार, फसवणूक व गैरव्यवहार प्रकरणात शिवराम चौधरी (वय ७५, रा. शिव कॉलनी) यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तत्कालीन तपासाधिकारी (स्व.) अशोक सादरे यांनी संस्थेचे संस्थापक प्रमोद भाईचंद रायसोनी (वय ५५, रा. बळिराम पेठ, जळगाव), दिलीप कांतिलाल चोरडिया (५१), सूरजमल भबुतमल जैन (५०), दादा रामचंद्र पाटील (६६), भागवत संपत माळी (६३), राजाराम काशीनाथ कोळी (४७), भगवान हिरामण वाघ (६०), यशवंत ओंकार जिरी (६०), शेख रमजान शेख अब्दुल नबी मन्यार (५५), सुकलाल शहादू माळी (४५), ललीताबाई ऊर्फ लता राजू सोनवणे (३९, सर्व रा. तळेगाव, ता. जामनेर), मोतीलाल ओंकार जीरी (५०, रा. शेळगाव, ता. जामनेर), डॉ. हितेंद्र यशवंत महाजन (५२, रा. बेंडाळेनगर, प्रेमनगर, जळगाव) व इंद्रकुमार आत्माराम ललवाणी (४०, रा. महाबळ, जळगाव) यांना २ फेब्रुवारी २०१५ ला अटक केली हेाती. संपूर्ण राज्यात विविध पोलिस ठाण्यांत दाखल खटल्यांमध्ये संशयितांची सुनावणी सुरू असून, शनिवारी दोषारोपपत्र ठेवण्याबाबत कामकाज होणार होते. मात्र, न्यायालयाने मंगळवारी (ता. ८) कामकाज ठेवले आहे. जळगाव जिल्हा न्यायालयात जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एन. हिवसे यांच्या न्यायालयात कामकाज सुरू आहे. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. केतन ढाके कामकाज पाहत आहेत.