भुसावळात रेल्वे वॅगनमधून डिझेलची चोरी

भुसावळात रेल्वे वॅगनमधून डिझेलची चोरी
bhusawal railway junction
bhusawal railway junction
Updated on

भुसावळ (जळगाव) : रेल्वे वॅगनमधून पेट्रोलसह डिझेल चोरीच्या घटनांना काही वर्षांपासून ब्रेक लागला असताना रेल्वे लाइनीजवळ काही कॅनमध्ये डिझेल सापडल्याने खळबळ उडाली. (jalgaon-bhusawal-junction-Diesel-stolen-from-railway-wagon-in-Bhusawal)

bhusawal railway junction
आईचा मृत्‍यू, दुसरीकडे मुलीचे लग्‍न; विवाहानंतर अंत्‍ययात्रा

रेल्वे लाइनीजवळ झुडपांमध्ये डिझेलच्या कॅन असल्याची माहिती सुज्ञ नागरिकांनी माध्यमांना दिल्यानंतर ही बाब रेल्वे सुरक्षा बलाला कळवण्यात आली. रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ आयुक्त क्षितिज गुरव यांनी तत्काळ सहायक आयुक्त बी. पी. कुशवाह आणि रेल्वे यार्डाचे आरपीएफ निरीक्षक दयानंद यादव यांनी दखल घेण्याची कळवल्यानंतर अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता डीझेलने भरलेल्या तीन कॅन आणि दोन तुटलेल्या कॅन आढळल्याने त्या जप्त करण्यात आल्या. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

घटनास्थळी भेट

रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वे यार्डात डिझेल चोरी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रेल्वे सुरक्षा बल आयुक्तांनी केली पाहणी रेल्वे सुरक्षा बल आयुक्त क्षितिज गुरव यांनी डिझेल चोरी प्रकरणानंतर घटनास्थळी भेट दिली. नेमक्या कॅन या भागात कुणी आणल्या याचा शोध घेण्याचे आदेश गुरव यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Jalgaon flyover collapse contractor FIR
Jalgaon bypass one way traffic
Marathi News Esakal
www.esakal.com